आदिवासींच्या विविध संघटने तर्फे मणिपूर घटनेचा निषेध Protest against Manipur incident by various tribal organizations

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्युज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.24 जुलै) :- संपूर्ण देशाला हादवणाऱ्या मणिपूरमधील बीभत्स व वेदनादायी घटनेच्या विरोधात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच इर्शाळवाडी येथील दरड कोसळुन या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली मृत्यू पावलेल्या आदिवासींच्या कुटुंबीयांना संपूर्ण उच्च शिक्षणाची सोय शासनाने त्यांच्या वाचलेल्या मुलांना दत्तक घेवून मोफत करून द्यावी.

अशा मागणीचे निवेदन आदिवासी बिरसा क्रांती दल महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा माया पेंदोर, आदिवासी कला संवर्धन समितीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष परमानंद तिराणिक, गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वनिता परचाके.

बिरसा क्रांती दल तालुका अध्यक्षा पुष्पाताई मेश्राम, संघटिका वनिता पेंदोर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी मा. शिवनंदा लंगडापूरे यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू भारत सरकार (राष्ट्रपती भवन) व मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि राज्यपाल यांच्याकडे सुपुर्द करण्याकरिता निवेदन देण्यात आले. बिरसाक्रांती दल महिला आघाडी माया पेंदोर, कला संवर्धन समिती जिल्हाध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण संस्थाचे जिल्हाध्यक्ष परमानंद तिराणिक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात कबीर कुमरे, ललीता आत्राम.

चंद्रकला गेडाम, आरती ऊईके, दिपाली मेश्राम, मडावी, कनाके, येरमे, रूक्मिणी तिराणिक, यांच्यासह अनेक आदिवासी समाजबांधव उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर तहसिल कार्यलयाच्या परिसरात निषेध आंदोलन करून दरम्यान आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी करून घोषणा देण्यात आल्या.