वरोरा रुग्णालयात तंबाखू न खाण्याची शपथ No Tobacco Oath at Warora Hospital

🔸तंबाखू चे परिणाम व दुष्परिणाम विषयी मार्गदर्शन(Guidance on the effects and side effects of tobacco)

✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.7 जून) :- तंबाखू विरोधी दिवस कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम मा..डाॅ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

 या कार्यक्रमाला मा.श्री राजेंद्र मर्दाने पत्रकार तसेच सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका, डॉ पिंपळकर मंचावर उपस्थित होते.प्रास्ताविक नेहा ईंदुरकर यांनी केले.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी विस्त्रुत तंबाखू विरोधी दिवसाची माहिती दिली.लक्षणे , परिणाम , इत्यादी माहिती दिली.

तसेच तंबाखू,घूटका खाल्ल्याने तोंड,जबडा आखडुन जातो.मोठा आ होत नाही.आणी काही ईमरजीअन्सी आली तर त्यावर आरोग्य खात्याला नीयंत्रण मिळवणे कठिण जाते.म्हणून तंबाखू गुटखा खावू नये व कर्करोगा सारख्या महाभयंकर आजाराला बळी पडु नये.तसेच डॉ पिंपळकर यांनी माहिती दिली.मा . राजेंद्र मर्दाने सर पत्रकार यांनी माहीती दिली.

आभार प्रदर्शन किरणं धांडे यांनी केले.या कार्यक्रमाला भरपुर रुग्ण व नातेवाईक यांनी लाभ घेतला.तसैच सर्व अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.या मार्फत प्रचार प्रसार करण्यात आलाया कार्यक्रमासाठी कूंदा मडावी,लक्षमिकांत ताले.ईयादींनि सहभाग घेतला.