विद्यार्थिनींची गळफास घेऊन आत्महत्या Student commits suicide by hanging

161

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.24 जुलै) :- कोठारी येथील वॉर्ड न १ ची रहिवाशी असलेली व जनता विद्यालय कोठारी येथे दहाव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीने आईवडील घरी नसतांना घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवरला उघडकीस आली.आसावरी अनिल चौधरी(१६) असे मृतक मुलीचे नाव आहे.

  मागील दोन दिवसांपासून ती शाळेत जात नव्हती. आज सोमवरला सकाळी तिची आई भात रोवणीच्या मजुरीसाठी कवडजई येथे गेली तर वडील सलुनच्या दुकानात गेले होते.आसावरी घरी एकटीच होती.तिने घरात कोणीही नसल्याची संधी साधली व गळफास घेऊन आत्महत्या केली.

वडील दुपारी घरी आल्यानंतर त्यास आसावरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.सदर प्रकारची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात आली.घटनेची नोंद घेऊन पुढील तपास ठाणेदार विकास गायकवाड यांचे मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.गळफास घेण्याचे कारण समजले नाही.

   जनता विद्यालय कोठारी येथे दहावीत शिकत असलेली आसावरी शिक्षणात हुशार होती.वर्गात शिकक्षकसोबत व मुलांसोबत तिचे वर्तणूक चांगले होते.शाळेतील हुशार मुलगी आत्महत्या केल्याची माहिती शाळेतील शिक्षकांना समजताच घरी जाऊन तिच्या आईवडिलांचे सांत्वन केले व शाळेत शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली.या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

https://smitdigitalmedia.com/