वर्धा नदीत तीन चिमुकल्याचा मृत्यू     Three children died in Wardha river

????एक वाचल्याने घटना आली उजेडात                 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.9 जुलै) :- गावालगत असलेल्या वर्धा नदीच्या सिंधी घाटावर मासोळ्या पकडण्यासाठी गेलेले तीन बालके बुडाल्याची घटना गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथे घडली असून त्यातील एक जण वाचल्याने घटना उजेडात आली.

सदर घटना आज दि.८ जुलै दुपारी १ वाजताच्या दरम्यानची आहे.माहिती मिळताच पालक,गावकरी,पोलीस घटनास्थळी जाऊन बुडालेल्या बालकांची शोध मोहीम हाती घेतली आहे.मात्र वृत्त लिहिपर्यंत मृतकांचा शोध लागला नाही. 

     आज दुपारी तोहोगाव येथील प्रतीक नेताजी जुंनघरे(१३) ,निर्दोष ईश्वर रंगारी(११),सोनल सुरेश रायपुरे(११), आरुष प्रकाश चांदेकर(११) सर्व बालके सकाळची शाळा सुटल्यानंतर वर्धा नदीत जार घेऊन मासे पकडण्यासाठी गेले.

पाण्याचा अंदाज न आल्याने प्रतीक जुंनघरे,निर्दोष रंगारी,सोनल रायपुरे हे खोल पाण्याच्या प्रवाहात बुडाले तर आरुष नदीच्या काठावर उभा असल्याने कसाबसा वाचला आणि गावात येऊन पालकांना घडलेली घटना सांगितली.

माहिती मिळताच पालक,गावकरी घटनास्थळी पोहचून शोध घेत आहे दरम्यान कोठारी,लाठी आणि विरुर पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी पोहचून शोध मोहीम सुरू केली आहे.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर गोंडपीपरी तहसीलदार शिवाजी कदम हजर झाले.मृतदेह शोधण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले मात्र वृत्त लिहिपर्यंत शोध लागला नाही. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

  सदर बालके शुक्रवार दि.७ जुलै ला नदीवर खेकडे पकडण्यासाठी गेले होते.कल नदीत पाणी कमी होते मात्र रात्ती पाऊस चांगला झाल्यामुळे नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली व त्याचा अंदाज बालकांना आला नाही व अनुचित घटना घडली.नदीत बुडून मृत झालेले तोहोगाव उच्च प्राथमिक शाळेचे वर्ग ५ वा व ७ व्या वर्गात शिकत होते शनिवार असल्याने शाळा सकाळची होती.