शेगाव पोलीस स्टेशन येथे निरोप समारंभ व वृक्षारोपण कार्यक्रम At Shegaon Police Station Farewell ceremony and tree plantation programme

104

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.7 जुलै) :- पोलीस स्टेशन शेगाव बु येथे आज बदली वर जाणाऱ्या पोउपनि जाधव साहेब , पोलिस अमलदार मोरेश्वर काकडे, समीर पठाण, आसिफ पठाण, श्रीराम कोकोडे, अतुल कांनवटे, रमेश पाटील, पूरर्शोत्तम भरडे, मंजुषा धारने.

वैशाली हेमके, रेशमा राठोड, पूनम ताडे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम एक झाड देऊन घेण्यात आला. पो उप नि प्रवीण जाधव साहेब यांची बदली अमरावती विभाग ला झाली आहे.

पोलिस स्टेशन शेगाव बू येथून बदली वर जाणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांची फुलाने वर्षाव करून त्यांना निरोप देण्यात आला.    

तसेच चिमूर डिविजन ला नव्याने रुजू झालेले पोलिस उप विभागीय अधिकरी मा. राकेश जाधव सर याचा स्वागताचा कार्यक्रम घेण्यात आला. 

उपस्थित पोलीस पाटील त्यांना मा.श्री.राकेश जाधव सा.उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुर यांनी मार्गदर्शन केले.

 मा.sdpo जाधव सर, पोलीस स्टेशन शेगाव बु येथील अधिकारी ,अंमलदार आणि पोलीस पाटील यांची हस्ते मा. पोलिस अधीक्षक परदेसी सर यांच्या ग्रिन पोलीस स्टेशन या संकल्पनेतून पोलिस स्टेशन ला विविध प्रकारचे झाड लाऊन वृक्ष रोपण कार्यक्रम घेण्यात आला.  

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान उपविभागीय पोलिस अधिकारी मा. राकेश जाधव यांनी भूषवले. सूत्रसंचालन पोलिस पाटील अविनाश चिंचोलकर तर आधार पोलिस अमलदार प्रदीप मोंढे यांनी मानले.