निरोगी राहण्यासाठी निशुल्क योग(yog)शिबिराचे आयोजन

🔸पतंजली योगपीठ हरिद्वार( Patanjali Yoga Peeth Haridwar) अंतर्गत निशुल्क योग शिबीर 

✒️गजानन लांडगे महागाव(Yavatmal प्रतिनिधी)

महागाव(दि .25 सप्टेंबर) :- शहरात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आठवडी बाजारासमोर सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोंबर 2023 पर्यंत निशुल्क योग शिबिराचे आयोजन केले आहे.  

मुख्य योगशिक्षक श्री प्रकाश जी वानरे प्रभारी पतंजली योग समिती पुसद यवतमाळ हरिद्वार प्रशिक्षित व YCB 3 योगशिक्षक सौ माधुरी वानरे जिल्हा प्रभारी महिला पतंजली योग समिती यवतमाळ हरिद्वार प्रशिक्षित व YCB 3 योगशिक्षक श्री कैलासराव भांगे योगशिक्षक पतंजली योग समिती पुसद यांचे मार्गदर्शनात योगशिबिर आयोजित केले असून सोबत इतर जाणकार योग शिक्षक व मार्गदर्शक राहतील.

मुख्य योग खालील प्रमाणे कोरोना काळाच्या नंतर चाळिशीच्या आतील तरुण लोकांचा हृदयविकारामुळे मृत्युसंख्या वाढतच असल्याने त्यावर प्रबोधन व व्यायाम त्यासह शुगर ,बीपी,थायरॉईड, कंबरेचा त्रास, पायाचा घुटन्याचा पोटाचा त्रास डोळ्याचा व्यायाम अकाली केस गळणे विविध आजारावर शिबिरामध्ये निशुल्क भाग घेऊन आपले व आपल्या परिवाराचे जीवन मान सुधारू शकता आरोग्यासाठी योग कसा करावा कोणता करावा कधी करावा किती करावा कोणी करावा या व इतर प्रश्नांचे समाधान सोबतच योग आसन प्राणायाम व्यायाम एक्यूप्रेशर आहार आयुर्वेद घरगुती उपाय व इतर माहिती ही शिबिरामध्ये मिळेल. तरी आपण कुटुंबासह योग शिबीराला अवश्य यावे. 

आपले कामे रोजच चालू असतात आपल्या शरीराला सतत सात दिवस सकाळचा ऐक तास वेळ द्या कोणतेही कारण न सांगता आवर्जून कुटुंबासह वेळ द्यावा यामध्ये सर्व व्यापारी बांधव व गावातील स्त्री आणि पुरुष युवक युवती प्रचंड प्रमाणात भाग घेणार आहे त्यामध्ये आपणही सामील व्हा असे आव्हान मुख्य आयोजक श्री जगदीश भाऊ उत्तमराव नरवाडे महागाव तालुका व्यापारी महासंघ तसेच प्रदीप गंगमवार तहसील प्रभारी महिला पतंजली योग समिती महागाव यांच्या वतीने या निशुल्क योग शिबिराचे आयोजन केले आहे

जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आठवडी बाजार समोर महागाव सकाळी 5-15 ते 7 -15 या कार्यक्रमासाठी गावातील समाज सेवक जगदीश नरवाडे, प्रदीप गंगमवार, विजय सूर्यवंशी, संजय नरवाडे, श्रीकांत माळोदे, अशोक तगडपलेवार, स्वप्निल नरवाडे, व्यंकटेश श्रीरामवार,वानोळे साहेब, अक्षय कोपरकर, शुभम भलगे ,हे सहकार्य करत आहेत 

वेळेच्या अगोदर येऊन आपले आसन ग्रहण करावे असे आव्हान मुख्य आयोजक जगदीश नरवाडे यांनी केले आहे. 

कोरोना नंतर वय वर्ष 40 च्या आतील लोकांचे हृदयविकाराने निधन होत असल्याने योग शिबिराचे आयोजन केले आहे. परिसरातील स्त्री व पुरुष युवक व युवती यांनी हजर राहून प्रत्येक घरात योगशिक्षक तयार झाला पाहिजे हा यामागचा मुख्य उद्देश आहे असे आव्हान तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश भाऊ नरवाडे यांनी केले आहे.