उद्योजक , साहित्यिक व समाजसेवक , इंजिनिअर प्रविण उपलेंचवार यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठा तर्फे मानद डॉक्टरेट प्रदान

✒️स्नेहा उत्तम मडावी गोवा(gowa प्रतिनिधी)

गोवा(दि.15 एप्रिल) :- आज रोजी बेवाच रिसॉर्ट, दक्षिण गोवा येथे एका भव्य दिव्य कार्यक्रमात इंटरनॅशनल institute ऑफ बिझनेस management & research tecknology , florida अमेरिका या नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने उद्योजक, साहित्यिक , समाजसेवक व इंजिनिअर श्री प्रविण मधुकर उपलेंचवार , नागपूर यांना त्यांच्या 35 वर्षाच्या साहित्य , व्यवसाय व समाजसेवा या तिन्ही शाखेतील विविध केलेल्या कामांचा गौरव करण्यासाठी d.lit मानद डॉक्टरेट ( phd ) ही सर्वात उच्चतम पदवी , गोवा चे माजी मुख्यमंत्री श्री कामत यांच्या हस्ते प्रदान करण्यास आली. या कार्यक्रमास ulhasnagar चे कमीशनर व विविध विद्यापीठाचे कुलगुरू प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते .श्री प्रविण उपलेंचवार यांनी आता पावेतो 150 पेक्षा जास्त कविता लिहून विविध कार्यक्रमात सादर केलेल्या आहेत. त्यांनी सुसाट ही 400 पानाची कादंबरी लिहिली आहे .

तसेच तरंग मेंदीचे या अल्बम मधील 18 गीते लिहून त्याला संगीत पण दिलेले आहे. तसेच मागील सहा महिन्यापासून ते विदर्भ प्रांतपाल मराठी साहित्य मंडळ या पदावर ,राष्ट्रीय मंडळाचे कामकाज करीत आहे व या त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या सहकारयाच्या सहकार्याने अखिल भारतीय साहित्य संमेलन तसेच राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार सोहळा या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी पणे आयोजन केले आहे. तसेच व्यावसायिक म्हणुन त्यांना 300 बंगले व 15 दुकानाचे तसेच 300 बंगले व 30 दुकाने असे व अनेक भव्य प्रकल्प उभारले आहेत.

तसेच मागील दहा वर्षांपासून ते organic किटकनाशक व खते यांचे उत्पादन व विक्रीचे काम करून भारतात organic चळवळ पसरवण्यासाठी हातभार लावीत आहे. तसेच श्री प्रविण उपलेंचवार यांनी मागील अनेक वर्षात रोटरी क्लब, आर्य वैश्य समाज , इंजिनियर क्लब व विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमाने अनेक समाजसेवि प्रकल्प उभारले आहेत .तसेच मागील 35 वर्षांपासून त्यांच्या वडीलांनि 50 वर्षांपासून स्थापना केलेल्या विद्यार्थी सहाय्यक समिती या संस्थेच्या वतीने दरवर्षी 900 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण मोफत/ अत्यल्प खर्चात वसतिगृहे व रहिवासी शाळा व जुनीयर कॉलेज द्वारे सोबतच उत्तम संस्कार व चरित्र घडवून आणण्याचे कामात प्रविण उपलेंचवार यांचा नित्य सहभाग असतोच.

अशा रीतीने श्री प्रविण मधुकर उपलेंचवार यांना बिझनेस management व साहित्य या विषयात त्यांना देण्यात आलेल्या d.lit या उच्च पदवी द्वारे गौरवीत करण्यात आल्याने व नुकतेच त्यांना सरदार walhabhabhai पटेल memorial foundation द्वारे त्यांच्या समाजसेवेच्या कामासाठी राष्ट्रीय शांतीदूत पुरस्कार देऊन तसेच worthy wellness foundation द्वारे प्रविण उपलेंचवार यांच्या व्यावसायिक वाटचालीसाठी राष्ट्रीय प्रतिभा सन्मान या पुरस्कार देण्यात आल्याने , प्रविण उपलेंचवार यांच्या या सर्वतोपरी यशासाठी चहूकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.