सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनराज आस्वले यांनी घेतली वयाच्या ७४ व्या वर्षी समाजशास्त्र विषयात पदवी Social worker Prof. Dhanraj Aswale graduated in Sociology at the age of 74

🔹सर्व स्तरातून त्यांचे कौतुक, विद्यार्थी व युवकांना प्रेरणादायी(He is admired from all levels, inspirational to students and youth)

🔸प्रसिध्द विधीज्ञ पुरुषोत्तम सातपुते यांनी दखल घेवून केले कौतुक(Renowned lawyer Purushottam Satpute took note and praised)

 ✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.29 जून) :- शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणाची आवड असली की वयाचे बंधन राहत नाही. वयाच्या ७४ व्या वर्षी पदव्युत्तर स्नातक पदवी प्राप्त करुन एक नविन पायंडा उभा करण्याचे काम येथील एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याने केले आहे.

           भद्रावती शहरातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरीक प्रा. धनराज आस्वले यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी नुकतीच समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी (एम.ए.) संपादित करुन विद्यार्थ्यांकरिता आदर्श निर्माण केलेला आहे.  

        धनराज आस्वले हे येथील स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. प्रा. धनराज कान्होबाजी आस्वले यांचा भद्रावती तालुक्यातील देऊरवाडा या गावातून प्रवास सुरू झाला. त्यांनी वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेले असून त्यांचे बी.एड., एम.फिल. झाले आहे.

सहकार व शिक्षण क्षेत्रात त्यांच्या आयुष्याची कारकीर्द गेली आहे. परदेशात बहरीन येथे छत्तीस वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. जगभरात एकोणचाळीस देशांना त्यांनी भेटी दिल्या. राष्ट्रहीत व समाजहित जोपासत त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. या वयात त्यांनी मिळविलेल्या या उपलब्धिबद्दल त्यांचेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

         प्रा. धनराज आस्वले यांनी परिसरातील विद्यार्थी व युवकानंकरीता एक आदर्श निर्माण केलेला आहे. त्यांचे कडून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, असे प्रसिध्द विधीज्ञ पी. एम. सातपुते यांनी म्हटले आहे. तर धनराज आस्वले हे समाजकार्य करताना शिक्षण घेत असून त्यांच्यातील शिक्षणाची आवड ही इतरांना ध्यास निर्माण करून देत आहे. मनुष्य निवृत्ती नंतरही शिक्षण घेवू शकतो व स्वताला अपग्रेड करत राहू शकतो, हा मार्ग त्यांनी दाखविला आहे, त्यांच्या कार्यास सलाम आहे, असे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी म्हटले आहे.

     भद्रावती तालुक्यातील  कोची येथील अपघातग्रस्त भक्ताच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरीता बबनराव धानोरकर आले असता त्यांनी आज रविवारला रविंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली