गूजगव्हाण रामदेगी फाट्यावर दारू ची विक्री  Sale of liquor at Goojgavan Ramdegi Phata

682

🔸एवध्य दारू विक्री बंद करण्याकरिता ग्राम पंचायतने बजावला नोटीस(The Gram Panchayat has issued a notice to stop the sale of such liquor)

🔹शेगाव पोलिसांच्या बेधडक कारवाया(Fearless actions of Shegaon Police)

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.11 जून) :- येथून जवळच असलेल्या व खानगाव ग्रामपंचायत हदित येत असलेल्या गूजगवान रामदेगी फाट्यावर दारू ची विक्री जोमात सुरू असून या गंभीर समस्या स्थानिक ग्राम पंचायत खानगाव यांनी विशेष दखल घेत ऐवध्य दारू विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीस बजावून ईव्यध्य दारू विक्री बंद करण्याकरिता नोटीस बजावली आहे… तरी देखील हे दारू विक्रेते कुणालाही न जुमानता आपली मनमानी करून दारू विक्री करीत आहे .

शिवाय शेगाव पोलिसांनी देखील यांच्यावर अनेकदा कारवाया करून त्यांना अटक देखील केली आहे तरी देखील ज्यादा पैसे कमावण्याच्या नादात आजही दारू विक्री जोरात सुरू आहे . हे दारू विक्रेते नाही पोलिसांना घाबरत नाही ग्राम पंचायत ला घाबरत ? यांचे आदेश पोलीसंच्या कारवाया ला देखील केराची टोपली दाखवत आपला व्यवसाय मुजरीने करीत असल्याचे सांगण्यात येत आहे…

   तेव्हा या एव्यध्य दारू विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर कठोर कारवाई करून दारू विक्रीचा व्यवसाय बंद करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.. 

         विशेष म्हणजे गुजगव्हण रामदेगी फाटा हा मुख्य असून याच फाट्यावरून रमदेगी व इतर गावात जाण्याचा मुख्य मार्ग आहे त्यामुळे इथे अनेक पर्यटक महिला प्रवासी तसेच विद्यार्थी यांची मोठी रेलचेल असते.

परंतु या इव्यद्य दारू विक्री मुळे सू सभ्य नागरिकांना महिलांना , विद्यार्थ्याना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तर अनेक मद्यप्राशन करणारे नागरिक भर चौकात , रस्त्यावर , दारू पिऊन जोपलेले असतात तर काही नागरिक दारू पिऊन अश्लील शिवीगाळ करतात. तर काही नागरिक दारू पिऊन धिंगाणा घालतात झगडे भांडणे करतात.

तर याचा नाहक त्रास मनस्ताप येथील महिलांना सहन करावा लागत असल्याने या चौकात भविष्यात महिलांची छेडखानी किंव्हा अनेक काही दुष्परिणाम होण्यास नाकारता येत नाही करिता रामदेगी गुजगव्हान फाट्यावर चालणारी इव्यध्य दारू विक्री कायमची बंद करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे …..