✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.25 जून) :- महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने यावर्षी दि.२५ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचे आयोजीत केलेले आहेत.
त्या अनुसंगाने वरोरा तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी, शेगांव बु यांच्या कार्यक्षेत्रात आज दि२५ जून रोजी अर्जुनी,पाचगाव,बोरगाव भोसले या गावात सप्ताहाचा पहिला दिवस कृषी पीक तंत्रज्ञान प्रसार दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन, कपाशी, तूर व धान पिकातील सुधारीत तंत्रज्ञानाविषयी माहिती यामध्ये सोयाबीन उत्पादन वाढीसाठी राबवायची अष्टसूत्री, बीबीएफ ,पट्टा व टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड, कापूस पिकाची विषम अंतर व रुंद सरी वरंभा लागवड, खत व तण व्यवस्थापन, भात बियाणे ची मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया इ.विषयावर सविस्तर मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी विजय काळे,कृषी पर्यवेक्षक प्रफुल्ल आडकीने, कृषी सहाय्यक पवन मत्ते,पवन मडावी व रोशन डोळस यांनी सभेच्या माध्यमातून केले
तसेच राज्य पुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ प्रकल्पातील वाटप झालेल्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया,सोयाबीन टोकण व पट्टा पद्धतीने लागवड,बेडवर डीबलर नी लागवड प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.याप्रसंगी संबंधित गावचे शेतकरी बांधव उपस्थित होते.
