✒️स्नेहा उत्तम मडावी चंद्रपूर(Chandrapur प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.6 सप्टेंबर) :- सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा गडचिरोली अंतर्गत सुशिला काव्य विचार साहित्य मंच तर्फे पहिले भव्य राज्यस्तरीय कविसंमेलन व कवयित्री प्रियंका वाकडे / शेंडे यांच्या आर्त हुंकार या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिनांक १०/९/२०२३रोज रविवारला नगरभवन कार्यालय वरोरा जिल्हा चंद्रपूर (बाजार रोड)येथे घेण्यात येत आहे.
सुशिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष मा.डॉ.प्रा.संघर्ष बळीराम सावळे, सर हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स स्टुंडंट ॲंम्बेसेडर ऑफ स्कॉटलंड डॉ.बा.आं.म.विद्यापीठ, संभाजी नगर.उद्घाटक:मा .प्रसन्नजीत गायकवाड,सर सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक
स्वागताध्यक्षा :मा. शोभा वेले , नागपूर प्रमुख अतिथी म्हणून मा.आचार्य गो.ना थुटे, सर सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक वरोरा मा.प्रा.मनोहर नाईक,सर सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, नागपूर मा.प्रकाश दुलेवाले,सर सुप्रसिद्ध साहित्यिक, नागपूर मा .सोपानदेव मशाखेत्री, गडचिरोली डी.बी.ए.विदर्भ प्रमुख, साहित्यिक पत्रकार मा.कल्पना टेंभुर्णीकर, नागपूर सुप्रसिद्ध साहित्यिका, नागपूर मा.रामनाथ खोब्रागडे,शिक्षण विस्तार अधिकारी गडचिरोली मा.प्रकाश खरवडे,अध्यक्ष जिल्हा ग्रामसेवक संघटना मा.लोकेश शेंडे,ग्रामसेवक वरोरा मा.संजूभाऊ वड्डेटीवार सामाजिक कार्यकर्ते घोट मा. विलास उईके आदिवासी जिल्हा अध्यक्ष गडचिरोली सत्कारमुर्ती मा.गोकुलदास वाकडे , अध्यक्ष सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा गडचिरोली सौ.सुशिला गोकुलदास वाकडे मा.अहेतशाम अली माजी नगराध्यक्ष, वरोरा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.स्वप्नील मेश्राम चंद्रपूर करतील.
कविसंमेलनाचे सुत्रसंचलन मा.नरेंद्र सोनारकर, सुप्रसिद्ध साहित्यिक,पूरोगामी पत्रकार संघ विदर्भ आणि मा.रविंद्र दयानंद राणा, मुंबई,करतील.सुशिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक ,साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
यामध्ये मा.गजानन गेडाम, गडचिरोली यांना, समाजभूषण पुरस्कार मा.गंगाधर शालिग्राम धुवाधपारे यांना समाजगौरव पुरस्कार मा.उषा घोडेस्वार, भंडारा काव्यरत्न पुरस्कार मा.सरिता गव्हारे, चंद्रपूर समाजगौरव पुरस्कार मा.छाया टिकले, चंद्रपूर रणरागिणी पुरस्कार मा.कविता गेडाम, गडचिरोली समाजगौरव पुरस्कार मा.मंगलाताई, पेटकर समाजरत्न पुरस्कार मा.सुशिला बुद्धभगवान भगत, आल्लापल्ली समाजगौरव पुरस्कार मा.समिर रामनाथ पिल्लेवान नागपूर आदर्श शिक्षक पुरस्कार मा.भास्कर अमृतसागर, धुळे समाजभूषन पुरस्कार मा.उज्वला वाल्मिक नगराळे काव्यरत्न पुरस्कार मा.कृष्णा सतिष राठोठकर समाजगौरव पुरस्कार या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या संस्थापिका प्रियंका वाकडे/शेंडे यांच्या आर्त हुंकार या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक संस्थापिका /सचिव मा.प्रियंका शेंडे, वाकडे अध्यक्ष मा. गोकुलदास वाकडे उपाध्यक्षा मा, गंगा सपकाळ, कार्याध्यक्ष मा.प्रभाकर दुर्गे,प्रशासक मा.स्नेहल वाकडे यांनी केले आहे.
