ट्रॅफिक पोलिसाची कौतुकास्पद कामगिरी 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.11 नोव्हेंबर) :- ट्रॅफिक पोलिस अधिकारी दिसला की अनेक दुचाकी स्वरास घाम फुटतो परंतु ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्यांची कामगिरी ही कौतुकास्पद असून जन सेवेकरिता रस्त्यावर उन उन्हाळा पाऊस अश्या अनेक संकटाचा सामना करीत आपले कर्तव्य बजावत असतो . अगर छोटा मोठा अपघात झाल्यास जीवाची पर्वा न करता अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर इलाज करून त्यांची प्राण वाचवितो . इतकेच नव्हेतर पोलीस कर्मचारी सदैव जनसेवेसाठी सदैव तत्पर असतो.

   तशीच आज एक कौतूकास्पद असलेली बाब शेगाव येथील ट्राफिक पोलीस अधिकारी श्री नितीन कुरेकर यांनी केली आहे.

आज सकाळ पासून शेगाव परिसरात एक मनोरुग्ण महिला विवस्त्र फिरत होती. सगडे तिच्या कडे एक मनोरुग्ण म्हणून संकुचित नजरेने बगन्याचे काम करीत होते. ही माहिती शेगाव पोलीस स्टेशन मध्ये ट्रॅफिक हवालदार या पदावर काम करीत असलेले नितीन कुरेकार यांना माहिती झाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही.

अखेर २ तसा नंतर सदर मनोरुग्ण महिला वरोरा चिमूर रोड वर चालताना त्यांना दिसली असता त्यांनी ट्रॅफिक ची कामगिरी बजावत असतानाच ते काम बाजूला ठेऊन सांगाड्यात आधी त्या महिलेला स्वखर्चाने शर्ट आणि पॅन्ट घेऊन दिला. व त्या महिलेला तो व्यवस्थित करुन दिला. त्या वेळी त्यांच्या सहकार्याला शेगाव पोलीस स्टेशन येथील होमगार्ड हेमंत पाटील हे सुद्धा होते. 

   एरवी ट्रॅफिक पोलीस म्हंटल तर सगड्याच्या मनात एक वेगळीच प्रतिमा तयार होते. पण शेगाव चे नितीन कुरेकार यांनी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन शेगाव वासियांना घडवून दिले. त्या मुळे त्यांच्या या कार्याला व वर्दीतल्या या माणुसकीला एक सलाम.