शिवसेनेचा वाघ अभय खिरटकर यांचे एकाकी निधन  Shiv Sena tiger Abhay Khirtkar passed away lonely

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.22 जून) :- येथून जवळच असलेल्या कोकेवाडा तुकुम येथील युवा झुंझार नेतृत्व करणारे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते . अभय खिरटकर यांचे बुधवार दिनांक २१ तारखेला दुःखद निधन झाले . यांच्या निधनाने भद्रावती वरोरा शेगाव परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

        अभय खिरटकर हे गेल्या अनेक वर्षंपासून शिवसेना पक्षाची धुरा सांभाळत अनेक गोर गरीब जनतेला न्याय मिळउन देण्यास सदैव प्रयत्न शील होते तर मागील पंचवार्षिक मध्ये ग्राम पंचायत कोकेवाडा तू. चे सरपंच पद देखील त्यांनी इमाने इतबारे सांभाळले होते . जनतेच्या न्यायासाठी सर्वस्वी शासकीय निमशासकीय कार्यालये संस्था व अन्य ठिकाणी त्यांचा मोठा आवाज होता तर त्यांच्या या बेधडक आवाजाने अनेक कार्य जनतेचे सहज होत असल्याने शेगाव वरोरा भद्रावती परिसरात शिवसेनेचा वाघ म्हणुन संबोधले जात होते . 

            अश्या त्यांच्या अनेक कार्याची दखल घेत त्यांना चंद्रपूर जिल्हा कंत्राटी कामगार चे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना पद देखील प्राप्त झाले होते. गोर गरीब जनतेच्या हक्का साठी न्यायासाठी ते सदैव रात्रंदिवस मेहनत घेत असल्याने गाव परिसरात त्यांची एक विशेष ओडख निर्माण झाली असून त्यांना शिवसेनेचा वाघ म्हणुन सर्वत्र ओडखले जात होते . त्यांच्या दुःखद बातमी ने गावात परिसरात शोककळा पसरली आहे.

अभय खिरटकर हे मृत्य समयी ते ५२ वर्षाचे होते त्यांच्या पछात त्यांचे कुटुंब असून त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून संत्वन करिता त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी अनेक नागरिक शिवसेना कार्यकर्ते , सामाजिक कार्यकर्ते भेटीस येत असल्याचे दिसत आहे…