शिवसेना पक्षाच्या विचारधारेला प्रेरीत होत घेतला पक्षप्रवेश He joined the party inspired by Shiv Sena’s ideology

71

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.29 जुलै) :- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे प्रमुख नेते आणि युवासेनेचे प्रमुख तसेच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विचाराशी प्रेरित होऊन बेलगाव( भु.) तसेच नेताजी नगर विंजासन आणि गौतम नगर भद्रावती येथील युवकांनी व महिलांनी शिवबंधन बांधून शिवसेना(उबाठा) पक्षात प्रवेश केला.

वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या उपस्थितीत या तरुणांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे.याप्रसंगी भद्रावती शिवसेना तालुकाप्रमुख व नगरसेवक नरेंद्र पढाल यांच्या नेतृत्वात बेलगाव(भू) ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर गाडगे तसेच शिवसेना उपशहर प्रमुख अरुण घुगुल यांच्या नेतृत्वात सचिन पाचभाई, सुनील पायघन.

नरेश कचाटे ,सुरज बावणे,विकास बावणे,कृष्णा मोहितकर,रामा टाले आणि भावना खोब्रागडे यांच्या नेतृत्वात व्यंकट रमण,सुरेश पेटकर ,शामलता पेटकर अश्विनी टिकले,वनमाला टिकले यांचा शिवबंधन बांधून पक्षप्रवेश करण्यात आले. या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) महिला जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, विधानसभा उप जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे.

विधानसभा संघटक मंगेश भोयर, तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना भद्रावती तालुका अध्यक्ष राहुल मालेकर, प्रशांत कारेकर, रोहीत वाभिटकर, संतोष माडेकर,गोपाल सातपुते व पदाधिकारीसह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती. वरोरा-भद्रावती शिवसेना (ऊबाठा) तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व स्वागत करण्यात आले.