✒️सुनील भोसले पुणे(Pune प्रतिनिधी)
पुणे (दि.16 जून) :- आधार सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र गोवा व कर्नाटक च्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल ॲवार्ड 2023 चा आदर्श कवयित्री प्रेरणा गौरव पुरस्कार तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा प्रिया प्रमोद दामले यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
रविवार दि.११जून २०२३रोजी संस्थेतर्फे आयोजित केलेल्या बेळगाव येथील कार्यक्रमात मिसेस इंडीया शुभांगी शिंत्रै , मा.डॉ.विक्रम शिंगाडे यांचे हस्ते दिला गेला.हा पुरस्कार त्यांच्यावतीने तितिक्षा इंटरनॅशनल च्या जेष्ठ सदस्या सौ.सुप्रियाताई लिमये यांनी स्विकारला.
प्रिया दामले ह्या गेली 10 वर्ष काव्यविषयक विविध उपक्रम सादर करीत आहेत. लवकरच त्यांचे काव्यवादळ येणार आहे. तत्पूर्वी त्यांचा तितिक्षा चे पहिले आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन घेण्याचा मानस आहे.
भा.ज.प च्या ज्येष्ठ नागरिक शहर सांस्कृतिक आघाडीच्या त्या उपाध्यक्षा आहेत.
श्री.शैलेश बडदे सरचिटणीस भा.ज.प. कला व सांस्कृतिक आघाडी पुणे शहर , साहित्य गौरव संस्थेच्या कार्याध्यक्ष मंदाताई नाईक आणि अल्प संख्यांक आयोग भारत सरकार सल्लागार समितीचे सदस्य मा.श्री. चरणजीतसिंग साहनी यांनी प्रियाताईंचे विशेष हार्दिक अभिनंदन केले आहे.
