स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण self Distribution of educational materials to adopted students under Sindhutai Sapkal Educational Adoption Scheme

98

🔸स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम(An initiative of Srinivas Shinde Memorial Ravindra Shinde Charitable Trust)

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती(दि .5 जुलै) :- स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर तर्फे स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक अभियान अंतर्गत ट्रस्टनी दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यापैकी तालुक्यातील घोडपेठ येथील तीन विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.

              भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथील अश्वजीत रामकिसन सोनटक्के व त्याची पत्नी हया कोरोणा काळात दगावल्यामुळे यांची दोन्ही मुले भार्गवी व गौरव हे पोरके झालेत. आजी कवडाबाई सोनटक्के हे गरीब परीस्थीती नातवांचा सांभाळ करीत आहे. तसेच कोरोणा काळातच देवराव कृष्णाजी लांडे हे मयत झाले. त्यांच्या दोन्ही मुलींचा शिक्षणाचा खर्च ट्रस्टनी उचलला. 

 ट्रस्टचे उपक्रम स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक अभियान अंतर्गत मागील वर्षी भार्गवी, गौरव, सिमरण व सौदर्या हयांना ट्रस्टीनी शिक्षणाकरीता दत्तक घेतले. यावर्षी सुध्दा दत्तक विद्यार्थ्याना शिक्षणाकरीता लागणारे शिक्षण शुल्क, पुस्तके, वहया, पेन, पेन्सील, युनीफार्म, जोडे, स्कुल बॅग, रेनकोट असे साहित्य ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, समाजिक कार्यकर्त्या व ट्रस्टचे सदस्या सुषमा शिंदे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

शैक्षणिक दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांचे शिक्षण पुर्ण होईपर्यंत ट्रस्ट यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील व दत्तक विद्यार्थ्यांचे शिक्षण पुर्ण करुन देईल व ट्रस्ट तर्फे विविध समाज उपयोगी अभियान राबविल्या जात असून गरजूंनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे म्हणाले.

  स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत वरोरा भद्रावती तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना ट्रस्टनी दत्तक घेतले असून दत्तक विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले असून ट्रस्टनी शिक्षणाकरीता नविन दत्तक विद्यार्थ्यांना सुध्दा शैक्षणिक साहित्य  वितरीत करण्यात येत आहेत.

                यावेळी ट्रस्टचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले,  सदस्या सुषमाताई शिंदे, दत्तक विद्यार्थ्यांचे पालक कवडाबाई सोनटक्के, किरण देवराव लांडे व इतर मंडळी  उपस्थित होते.