NEET परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबाचा सत्कार felicitation of NEET qualified students and their families

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.16 जून) :- सन 2023 मध्ये झालेल्या वैद्यकीय पात्रता प्रवेश परिक्षा NEET मध्ये मयूर गजानन काहुरके यांनी ६०६ ,मनस्वी शंकर खिरटकर हिने ६०२ तर श्रावणी संजय विरमलवार हिने ५६५ गुण प्राप्त करून नेत्रदीपक यश मिळवले.

याबद्दल स्व. श्रिनिवासराव शिंदे च्यरिटेबल ट्रस्ट चे सर्वेसर्वा तथा चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक श्री रविभाऊ शिंदे यांनी ग्रामगीता व पुष्पगुच्छ देऊन यशप्राप्त विद्यार्थी व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार केला.

या प्रसंगी प्रा. धनराज आस्वले कार्यकारी अध्यक्ष स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर, श्री दत्ता भाऊ बोरेकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा, श्री अरुणभाऊ घुगल व श्री विजय सातपुते प्राथमिक शिक्षक हे उपस्थित होते.