सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती मी महाराष्ट्राची मॉडेलिंग शो अतिशय उत्साहात संपन्न Modeling shows of Soundaryakanya Me Maharashtra and Saubhagavati Me Maharashtra were concluded with great enthusiasm

🔸इंडिया स्टार गौरव पुरस्कार सोहळा संपन्न (India Star Gaurav Award ceremony concluded)

🔹मागील सर्व रेकॉर्ड मोडून काढत नवीन रेकॉर्ड केला(A new record was set, breaking all previous records)

🔸नितीन झगरे पुन्हा एकदा ठरले किंगमेकर(Nitin Zagre is once again the kingmaker)

🔹डॉ.स्नेहा लोंढे,संजीवनी खांडके व विद्या सुर्यवंशी मिसेस इंडिया विजेत्या(Dr. Sneha Londhe, Sanjeevani Khandke and Vidya Suryavanshi are the winners of Mrs. India)

✒️सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

 पुणे (दि.4 जून) :- सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती मी महाराष्ट्राची व राजकुमारी मी महाराष्ट्राची आणि राजकुमार मी महाराष्ट्राचा हा शो सोमवारी आयोजित करण्यात आला होते या शो ला भव्य दिव्य असा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व जिल्ह्यांमधून या शो साठी स्पर्धकांनी सहभाग घेतला. मिस.मिसेस.किड्स असे या मॉडेलिंग शो चे स्वरुप होते.

या अहो ला परिक्षक म्हणून द रॉयल ग्रुप कोकण ब्रँड अम्बेसिडर दर्शना पाटील, मॉडेल स्नेहल सरगर, मॉडेल आकांक्षा कुंभार यांनी काम पाहिले. द रॉयल ग्रुप चे डायरेक्टर नितीन झगरे यांनी सर्वांना मॉडेलिंग शो मधील संधी, नवीन स्पर्धकांना कसे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाते.

या बद्दल माहिती दिली.स्रिया या पारंपारिक वेशभूषेतच छान दिसतात आणि मराठी संस्कृती टिकविण्यासाठी आम्ही मराठमोळा शो आयोजित केला आणि यशस्वी पण केला असल्याचे नितीन झगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.. पुन्हा एकदा पुणे मध्ये नितीन झगरे किंग मेकर बनले.अन पुणे मधील सर्वात मोठा सोहळा यशस्वी केला…या शो मध्ये सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची विनर तेजस्वीनी घावटे,तर प्रथम सायली काकडे, द्वितीय प्रिय्ंका जगताप,तृतीय काजल रणशृंगारे ठरल्या.

तर सौभाग्यवती मी महाराष्ट्राची विनर औरा मंचेकर, आरती लोंढे,प्रथम काजल जाधव,निधी शेलार, द्वितीय रितू धूमाळ,केतकी ठोंबरे,तृतीय अश्विनी वाघमारे, संहिता हारणे विजयी झाल्या.या शो साठी प्रमुख पाहुणे म्हणून बिग बॉस फेम भूमाता ब्रिगेड अध्यक्षा मा. तृप्तीताई देसाई, एस.डी.आर फाऊंडेशन अध्यक्षा डॉ.सीमा इंग्रोळे, मिसेस मुख्यमंत्री व बिग बॉस फेम अमृता धोंगडे,रिल्स स्टार बबडी फेम अंजली ढमढेरे ,अल्विरा मोशन पिक्चर डायरेक्टर मॉडेल दिपाली कांबळे.

दिग्गदर्शक विकास बैकर, उद्योजक चांदभाई शेख, लेखक आबा गायकवाड, दिपाली पाटील,दिपाली सावंत, प्राची सावंत, निशीगंधा लोंढे, डॉ.शामकुमार लोंढे, डॉ.स्नेहा लोंढे ,समाजसेवक दिपक दिक्षित महाराज,सीमा राजपुत,स्नेहल सरगर,राजेश्वरी मोटे,माया खंकाळ, गृरुवर्य प्रकाशभाऊ शिंदे, साईशा तेजम, डॉ.स्वरांजली गायकवाड यांना इंडिया स्टार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेकअप पार्टनर सखी ब्यूटी पार्लर च्या तृप्ती भोसले,हेअर पार्टनर कृणाल Acadamey , गिफ्ट पार्टनर दंताळे ज्वेलर्स, क्षितिज दंताळे ग्रुमिंग पार्टनर अरबाज मूलानी ऐंकरिंग मयुरेश अभ्यंकर सर यांनी काम पाहीले.

रॉयल क्वीन ऑफ़ इंडिया विनर विद्या सुर्यवंशी, Glam आयकॉन ऑफ इंडिया विनर डॉ.स्नेहा लोंढे, गॉर्जियस ऑफ इंडिया विनर संजीवनी खांडके या विजयी झाल्या. राजकुमार व राजकुमारी मी महाराष्ट्राची विनर प्रांजल लोंढे, चैत्राली पगारे,आदित्य शिशूपाल, पार्थ मैड तर प्रथम परिनिती केकतपुरे, अनन्या शिशूपाल,आराध्या डोणे,नैरार्षी 

द्वितीय अनुष्का नायडू ,अन्विका मोरे,पलक धरणे,खूशी , तृतीय शेजल शिंदे, सार्था तुले,दिव्यांशी जाधव, तपस्या घोरपडे विजयी झाल्या.

 आकाश रणदिवे,प्रा.आशिष रजपूत, डॉ.स्नेहा लोंढे, युवाक्षी पाटील, प्रकाश यादव, सागर पवार, संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले, जावेद शेख, एस.डी.आर फाऊंडेशन अध्यक्षा सिमाताई इंग्रोळे, मॉडेल वैष्णवी काळे,तेजल मुनेश्वर, हर्षाली शिरसाळे .संचालक श्री विजय जगताप ,श्री मनोहर भावसार सर , फोटोग्राफर मंदार, तेजस नाईकवाडी, गियाजी डफळे,गौरव माने,रोहन सकपाल,दिनेश चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले..