अंशतः अनुदानित शिक्षकांचा कर्तव्यमूर्ती तथा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न Induction and retirement ceremony of partially subsidized teachers completed

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.3 ऑगस्ट) :- स्व. रामनारायण जयस्वाल शिक्षण संस्था खेमजई द्वारा संचालित राजीव गांधी विद्यालय खेमजई ता .वरोरा , जिल्हा चंद्रपूर येथील सह.शिक्षक श्री भीमा तिमाजी पाटील हे निष्ठापूर्वक सेवापूर्ती करून नियत वयोमानाने दिनांक 31.7. 2023 रोज सोमवारला सेवानिवृत्त झाले. त्या प्रित्यार्थ त्यांच्या कार्यप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन 3 ऑगस्ट 2023 ला करण्यात आले.

   श्री भीमा तिमाजी पाटील व त्यांच्या सौभाग्यवती मृणालिनी भीमा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कन्हैयालाल जयस्वाल माजी कृषी सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर तसेच प्रमुख उपस्थिती संजय दिगंबर पारोधे उपाध्यक्ष स्व.रा.ज.शिक्षण संस्था खेमजई दिलीपजी वाभीटकर आबमक्ता मुख्याध्यापक (आब)मुरलीधर काळे सर, रमेशजी चौधरी ग्रा.पं सदस्य रामटेके सर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पेटकर सर, प्रास्ताविक शाखेचे मुख्याध्यापक बोबडे सर,आभार प्रदर्शन पारोधे यांनी केले

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खिरटकर सर ,जोगी सर, मडावी सर ,तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी घडले बाबू ,प्रफुल जयस्वाल, नंदकिशोर नवघरे ,नरेंद्र लभाने व सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी सहकार्य केले.