भद्रावतीतील आदर्श व्यक्तिमत्व विनोदराव घोडे अनंतात विलीन Vinodrao ghode, the ideal personality of bhadravati, merges into anant

164

✒️शिरीष उगे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.19 एप्रिल) :-

        येथील प्रतिष्ठित नागरिक, एक आदर्श व्यक्तिमत्व ,लोकमान्य विद्यालयातील उत्कृष्ट शिक्षक, उत्तम सुवर्णकार ,भद्रावतीच्या सर्व जाती धर्माच्या धार्मिक ,सामाजिक ,कार्यात हिरीरीने भाग घेणारे विनोद घोडे यांचे आज दि. 19 एप्रिल पहाटे 5 वाजता हृदयविकाराने निधन झाले.

शेवटच्या क्षणी त्यांची सुश्रुषा होत असताना ते अबोल राहिल्याने नाईलाजास्तव त्यांच्या प्रेताची भद्रावतीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरी तपासणी करण्यात आली.मृत्यू समय ते 58 वर्षाचे होते आणि विशेष म्हणजे त्यांचे सेवाकाळाची निवृत्ती पुढल्या मे महिन्यात होणार होती हे मात्र नीयतीला मान्य नसावी.

त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावत दि.19 एप्रिलला स्थानिक पिंडोनी स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या मृतात्म्यास चिर शांती मिळो यासाठी उपस्थित शोकाकुल जनसमुदायांनी त्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहिली.

https://smitdigitalmedia.com/