महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या लगतची दुकाने हटवा …अमर गोंडाने  Remove the shops near the statue of Mahanav Babasaheb Ambedkar ..Amar Gonda

75

🔹बौद्ध अनुयायी आक्रमक(Aggressive Buddhist followers)

 ✒️शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.27 मे) :- वरोरा शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगदी पुतळ्या लगत फळा – फुलांची तसेच इतर ही छोटी -मोठी दुकाने थाटलेली असतात ती दुकानें त्वरित हटवा असे एका निवेदना द्वारे सामाजिक कार्येकर्ते अमर गोंडाने यांनी इशारा दिला असून आज दि. 25मे2023 रोजी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.

         या आधी सुद्धा बऱ्याच वेळा नगरपरिषद वरोरा यांना विविध संघटना तर्फे निवेदन देण्यात आले होते परंतु न. प ने आजपर्यंत कुठलीही ठोस कारवाई केली नाही किंबहुना न. प प्रशासनाने कोणतीही दखल न घेता इतक्या गंभीर प्रकरणात कानाडोळा केल्याचा आरोप समाजिक कार्यकर्ता अमर गोंडाने यांनी केला.

     आज दी. 25/05/2023 रोजी समाजिक कार्यकर्ते अमर गोंडाने तसेच शिष्टमंडळामार्फत मुख्याधिकारी नगरपरिषद वरोरा यांची भेट घेऊन, लवकरात लवकर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यालगत व परिसरात असलेली दुकाने त्वरित हटवावी ऑटो थांब्यावर बंदी घालावी, सौंदर्यकरणासाठी मंजूर झालेला 19 लाखाचा निधी वापरून पुतळ्याचे सौंदर्यीकरण केले जावे. तसे न झाल्यास आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन छेडले जाईल असा इशारा अमर गोंडाने यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना निवेदनातून दिला.

    यावेळी आंबेडकरी अनुयायी श्री जगदीश माळके सर , श्री संजयजी मेश्राम सर , श्री बंडू तेलंग सर , श्री दिलीपजि धनविग, श्री बापूराव रामटेके , श्री दत्तत्रय वानखडे सर तसेच इतर कार्यकर्ते शिष्टमंडळात सहभागी होते