ट्रस्टनी प्राविण्यप्राप्त लक्ष्मी बदखल विद्यार्थीनीचा केला‍ गौरव The trust felicitated Lakshmi Badakhal, a graduate student

🔸कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी केले आभासी पध्दतीने अभिनंदन (Executive Chairman Prof. Dhanraj Aswale gave virtual congratulations)

 ✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.23 मे) :- केवळ आठवीच्या विद्यार्थ्यांकरीताच घेण्यात येत असलेल्या डिसेंबर 2022 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झालेला असून लोकमान्य विद्यालय भद्रावती येथील विद्यार्थीनी कुमारी लक्ष्मी सुनील बदखल, रा. गवराळा, भद्रावती हिला या परीक्षेत 95.69 टक्के गुण घेत करीत शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य प्राप्त केले.

        आपल्या महान भारत देशाचे ब्रिद वाक्य *“मुलगी वाचवा, मुलगी शिकवा”* याला अनुसरुन लक्ष्मी बदखल ही ईतर विद्यार्थ्यांनाकरीता मार्गदर्शन ठरावे हा दृष्टीकोण समोर ठेवून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल ट्रस्ट चे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी ट्रस्ट मार्फत गौरव करण्याची इच्छा बोलून दाखवीली.

       ट्रस्टमार्फत राबविण्यात येत असलेले *विदेही श्री संत सदगुरु जगन्नाथ महाराज जानजागृती, प्रबोधन व सामाजिक अभियान उपक्रम* अंतर्गत आज (दि. 22) रोजी कुमारी लक्ष्मी बदखल हिचा ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुजी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कारेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ, संस्थेचे मानचिन्ह तसेच रोख स्वरूपाथ बक्षीस देवून गौरव करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी विद्यार्थीनी लक्ष्मी बदखल हिला पुढील शिक्षणाकरीता कोणतीही अडचण असल्यास ट्रस्टसोबत निसंकोच संपर्क साधण्याचे आवाहन केले.

        ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांच्यात आजही एक विद्यार्थी दडलेला आहे व त्यांचा आज एम.ए. परीक्षेचा पेपर असल्यामुळे ते कार्यक्रमास हजर राहू शकले नसल्याने दिलगीरी व्यक्त केली. त्यांनी कुमारी लक्ष्मी बदखल यांचे परीक्षेत प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल आभासी पध्दतीने अभिनंदन केले. 

       आज कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती येथे नवनिर्वाचित सभापती व उप-सभापती यांचा पदग्रहण सोहळा आयोजीत केला होता. याच व्यासपिठावरील मान्यवर व उपस्थित गणमान्य व्यक्तीच्या साक्षीने कुमारी लक्ष्मी हिचा गौरव कार्यक्रम संपन्न झाला व मान्यवरांनी अभिनंदन करुन आशिर्वाद दिले.

       या गौरव कार्यक्रम प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, कृ.उ.बा.स. भद्रावतीचे सभापती भास्कर ताजणे, उपसभापती अश्लेषा जिवतोडे भोयर, नवनिर्वाचीत संचालक मंडळी तसेच माजी नगराध्यक्ष सुनिल नामोजवार, कौरासे गुरुजी, प्रतिष्ठीत व्यापारी खेमचंद हरीयाणी, प्रशांत कारेकर, ज्ञानेश्वर डुकरे, मुधोली सरपंच बंडू पाटील नन्नावरे व ईतर गणमान्य व्यक्ती उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन कृ.उ.बा.स. भद्रावती चे सचिव नागेश पुनवटकर तर आभार प्रदर्शन अरुण घुगल यांनी केले.