राजकीय कार्यक्रमातील मांसाहारावर चर्चा म्हणजे बौध्दीक दिवाळखोरीचे प्रदर्शन Discussing meat in a political program is an exhibition of intellectual bankruptcy

83

🔸चिमुर विधानसभा क्षेत्रात खाण्या-पिण्याच्या चर्चा घडवून मुळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न(An attempt to sidestep the basic issues by holding food and drink discussions in Chimur assembly constituency)

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.25 मे) :-     

         जिल्हयातील चिमुर विधानसभा क्षेत्र हे वेगवेगळया कारणामुळे चर्चेत असते. काल-परवा कॉंग्रेसने आयोजीत केलेल्या कार्यकर्ता मेळावा झाल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना “बकऱ्याचे मटन” खाऊ घातले. भोजनदान करणारे व भोजन ग्रहण करणारे गप्प असले तरी काही विरोधक राजकारणी “बकऱ्याचे मटन” या विषयावर चर्चा करुन जनतेचे मनोरंजन करीत आहेत.

चिमुर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेवुन सामाजिक उपक्रम, कार्यक्रम घेवुन गरजवंतांना सहकार्य करणारे युवा नेते दिवाकर निकुरे यांनी खडसंगी परिसरातील शेतशिवारात भव्य असा कांग्रेस कार्यकर्ता मेळावा घेतला. अपेक्षेपेक्षा जास्त कार्यकत्यांची उपस्थिती होती. दिवाकर निकुरे यांचा राजकीय आलेख वाढत असल्यामुळे राजकीय विरोधकांच्या पोटात दुखू लागले आणि त्यांनी “बकऱ्याचे मटन” या तमाशाला प्रारंभ केला आहे. राजकीय विरोधकांचा “तमाशा” व दिवाकर निकुरे यांचे “सामाजिक कार्यक्रम” यामध्ये जनता निकुरे यांना स्विकारतांना दिसत आहे. वास्तविक पाहता कांग्रेस मेळाव्याचे आयोजनात दिवाकर निकुरे यांनी मांसाहारी व शाकाहारी दोन्ही जेवण्याचा पर्याय ठेवला होता. मात्र मांसाहार करण्यायांची संख्या अधिक असल्याने शाकाहारी भोजन शिल्लक पडले. याचाच अर्थ भोजन करणाऱ्यांनी मांसाहाराला प्राधान्य दिले. यात दिवाकर निकुरे यांचे काय चुकले?

खडसंगी येथील कॉंग्रेस कार्यकर्ता मेळावा ज्या दिवशी होता, त्या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान, संगणकीय क्रांतीचे पुरस्कर्ते तथा विज्ञानवादी नेते राजीव गांधी यांची पुण्यतिथी होती. हेच कारण पुढे करुन काही (सर्वच नाही) समाजमाध्यमातील व्यक्तींना हाताशी धरून राजीव गांधी यांचे पुण्यतिथीचे दिवशी मांसाहार का? हा प्रश्न चर्चेत आणल्या गेला. संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर कोण काय खातो? काय करतो? हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे.

ज्याप्रमाणे काही महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी किंवा धार्मिक उत्सवाचे वेळी शासनाकडुन पशु हत्या करु नये असे पत्रक काढल्या जाते (यात पशु हत्या बंदी असा उल्लेख असतो, मांसाहार करू नये असा उल्लेख राहत नाही) तशा प्रकारचा कुठलाही आदेश, परिपत्रक स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्य शासनाने काढले नव्हते. त्यामुळे कार्यक्रम झाल्यानंतर भोजनात मांसाहार असणे यात गैर काय ?

जयंती किंवा स्मृतीदिन हि संबंधीत व्यक्ती, समुह यांच्या विचारसरणीचा विषय आहे. यात आहाराचा कुठलाही विषय नसतांना बौध्दीक दिवाळखोरांनी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे जेवणाचा विषय चर्चेत आणला. यामध्ये “आपण काही करायचे नाही अणं दुसऱ्यांना करू द्यायचे नाही” हा मुद्दा घेवून दिवाळखोरांचे वागणुकीवर जनता चर्चा करीत आहे. श्रीमती इंदिरा गांधी त्यांचे कार्यकाळात त्यांनी सेक्युलर भारत म्हणजे धर्मनिरपेक्ष भारताचे स्वप्न बघुन त्याप्रमाणे काम केले. धार्मिक कर्मकांड व कर्मविकाप हे बहुजन समाजाला उच्चवर्णीय लोकांचे हातचे बाहुले बनवून त्यांना गुलाम बनविण्याचा डाव होता. त्याच परंपरेचा भाग म्हणून बहुजन समाजाला मांसाहारापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव मांडल्या गेला.

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून मांस खाल्ले जाते. भारतीय स्वयंपाक घरात मांसाहार व शाकाहार असे दोन्ही प्रकारचे पदार्थ बनविण्यात येतात. गीतेत तिन प्रकारचे माणसे सांगितली आहेत. सात्वीक, राजसिक आणि तामसिक. तसेच तिन प्रकारचे आहार सुध्दा सांगितले आहे. कोणत्या माणसाने कोणता आहार करावा असे गुणपरत्वे सांगितले आहेत. तिथे सुध्दा मांसाहार करू नये असे सांगितले नाही. मांसाहाराचे विषय प्रामुख्याने तिन मुद्दे घेण्यासारखे आहेत. हिंसा-अहिंसा, शौच-अशौच आणि प्रवृत्ती निवृत्ती. यावरुन व्यक्ती समाज, परिस्थिती आणि कालानुरूप आहाराचे नियम बनत असतात. आज आपल्याकडे भाज्या आणि डाळीचे विविध प्रकार आहेत. ते अर्थातच त्या काळात नव्हते. त्यामुळे मांसाहार करावा लागत असे.

दारु पिणे, मांसाहार करणे या दोन्ही वैयक्तिक निवडीच्या बाबी आहेत. “मांसाहार करणे चुक आहे. करु नको” असे एखाद्या आजच्या काळातील मांसाहारी माणसाला सांगितले तर तो

बांबूने फटके द्यायला कमी करणार नाही. तरीपण समजा एकवेळ मानले की, हे चुक आहे. तरी व्यक्ती स्वातंत्र्याची बाब आहेच. कोणताही माय का लाल मांसाहार किंवा मद्यपान प्रेमीला रोखु शकत नाही. खाणाऱ्याचा आक्षेप नसेल तर मांसाहार करणे चुकीचे नाही. असो……

विषयाचे विषयांतर होवु नये म्हणुन मूळ मुद्याकडे येवु. चिमूर विधानसभा क्षेत्रात दिवाकर निकुरे यांनी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात सुमारे अडीच ते तिन हजार कार्यकत्यांची उपस्थिती ही त्यांची जमेची बाजु आहे. त्यांचा लोकसंग्रह दिवसागणिक वाढत आहे. राजकीय क्षेत्रात पारंगत असल्याचा गाजावाजा करणाऱ्या विरोधकांसाठी दिवाकर निकुरे या ३५ वर्षीय युवकांनी दिलेली चपराक आहे. दुसऱ्याच्या कार्यक्रमात काय झाले? हे बघण्यापेक्षा आपले काम वाढविण्याचा प्रयत्न राजकारण्यांनी करावा अशी सद्बुध्दी निर्माता देईल अशी अपेक्षा बाळगणे हेच आपल्या हातात आहे.

सुरेश डांगे, संपादक-पुरोगामी संदेश मो. नं. ८६०५५९२८३०