डब्ल्यू एस एफ वरोरा चे तीन खेळाडू महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघात तर निखिल बोबडे मुख्य प्रशिक्षक पदी निवड Three WSF Warora players in Maharashtra state volleyball team, Nikhil Bobde as head coach

248

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)     

चंद्रपूर (दि.22 मे) :- चंदन नगर , जिल्हा- हुगळी, (पश्चिम बंगाल) येथे दिनांक २७/५/२०२३ ते १/६/२०२३ दरम्यान होणाऱ्या सब-ज्युनिअर गट राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता वरोरा स्पोर्टस फाउंडेशन वरोरा व लोक शिक्षण संस्था वरोडाचे खेळाडू पार्थ गजानन जीवतोडे याची महाराष्ट्र राज्य मुलाच्या संघात तर पूर्वा गजानन घानोडे व राधा किशोर कडू यांची मुलीच्या गटात निवड झाली आहे. तर निखिल बोबडे यांची मुलांच्या महाराष्ट्र संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाली.

सदर खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत पाटील सर, उपाध्यक्ष श्रीकृष्णाची घड्याळ पाटील सर, वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जीवतोडे, सुनील बांगडे, देवानंद डुकरे, विनोद उंमरे, गणेश मुसळे,दुष्यंत लांडगे यांना दिले. खेळाडूंच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

https://smitdigitalmedia.com/