खानगांव येथे पट्टेदार वाघाणे केली बैलाची शिकार

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.18 ऑक्टोबर) :- चिमूर तालुक्यातील खानगांव येथील शेतकरी यांनी आपल्या शेतात कामे पूर्ण करून चारा पाणी करिता बैल आपल्या शेतामध्ये बांधून ठेवला होता . परंतु दडी मारून असलेला पट्टेदार वाघ हा आपल्या शिकरच्या शोधत असून त्याने या बैलावर झेप घेऊन त्याच्या नरडीचा घोट घेऊन त्याला जागीच ठार करून आपली शिकार केली.

तेव्हा यात पीडित शेतकऱ्याचे फार मोठं नुकसान झाले असून या गरीब शेतकऱ्यावर दुःखाचे डोंगर कोसळून त्यावर आर्थिक भुर्दंड बसला.यामुळे या शेतकऱ्यांना ऐन शेती हंगामात आर्थिक फटका नसल्याने तसेच त्याचा उजवा हात मोडल्याने समोर शेती कसने शेतीचे संगोपन करणे कठीण झाले आहे तेव्हा खानगाव येथील पीडित शेतकरी अशोक गायकवाड यांना तात्काळ वण विभाग तसेच संबधित विभागातून आर्थिक मदत देण्यात यावी जेणे करून हा शेतकरी पुढील शेती हे सुखाने करेल व आत्महत्या करण्यास प्रववूत होणार होणार नाही याची जाणीव संबधित विभागाने घावी .

          तसेच या घटनेमुळे या शेतशिवतात तसेच गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.तेव्हा या शेत शिवारात शेतात काम करण्यास शेत मजूर शेतकरी जाण्यास भित आहे .