कीर्तनकार, प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचेवर झालेल्या प्राण घातक हल्ल्याचा तीव्र निषेध..रवींद्र तिराणिक  Strong condemnation of fatal attack on kirtanakar, preacher Satyapal Maharaj..Ravindra Tiranik

563

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.21 मे ) :- अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, अनिष्ट रूढी व परंपरा विरुद्ध सातत्याने कीर्तनाच्या माध्यमाने प्रबोधन करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा ,शाहू महाराज, सावित्रीबाई फुले , महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रभावी व्यापक विचार प्रदर्शित करीत जन जागृती करणारे.

अकोला जिल्ह्यातील अकोट येथील प्रसिद्ध सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज( सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर) आपल्या पुरोगामी विचारसरणीतून विद्यापीठात व इतर कॉलेज विविध स्तरावरील समारंभात- कार्यक्रमात विविध विषयावर सातत्याने प्रबोधन करतात.

काल -परवा बुद्ध जयंती निमित्त मुंबईतील नायगाव येथे कार्यक्रमात असताना समारोपीय कार्यक्रम पार पडल्यानंतर सत्यपाल महाराज यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला ही बाब पुरोगामी महाराष्ट्रत निंदनीय आहे.

अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या समाज सुधारक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, यांच्यानंतर पुरोगामी विचारसरणीचे प्रबोधन व कीर्तनकार सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचेवर प्राण घातक हल्ला व्हावा ! आणि असे हल्ले घडीतच राहावे. आणि सर्वच क्षेत्रातील विविध पातळीवर कार्य करणारी मंडळी आपण शंड म्हणून गप्प बसून राहावे.

ही बाब येणाऱ्या पिढीला विचार मंथन करायला लावणारी आहे . महाराष्ट्रातील समाजसुधारक, प्रबोधन- कीर्तनकार संपविण्याचे षड्यंत्र चालले आहे काय, महाराष्ट्र कुठल्या दिशेने वाटचाल करतोय .ही बाब निंदनीय आहे निषेधार्थ आहे.

या घटनेचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख ,जनमंच सदस्य, महाराष्ट्र अंनिस सदस्य, “द” ट्रायबल पोस्ट चीफ ब्युरो महाराष्ट्र ,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिराणिक यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.