चिल्ली येथे अंकुर तर्फे विद्यार्थ्याना दोनेशे वह्या वाटप Distribution of two hundred booklets to students by Ankur at Chilli

118

✒️गजानन लांडगे महागाव (यवतमाळ प्रतिनिधी)

महागाव (दि.7 मे) :- तालुक्यातील चिल्ली ईजारा येथे जि.प.प्राथ.मराठी शाळेतील 200 मुला मुलींना अंकुर सीड्स कंपनीतर्फे मोफत वह्या वाटप करण्यात आले , अंकुर सीड्स कंपनीने सामाजिक बांधिलकी दाखवली अशाच प्रकारे शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या विविध क्षेत्रातील कंपनीने चिल्ली येथील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करून सहकार्य करण्याचे आवाहन अनिल कोकणे (सरपंच )यांनी केले.

 याप्रसंगी ज्ञानेश्वर आडे (अंकुर सीड्स प्रतिनिधी ) अनिल कोकणे (सरपंच )शिवानंद राठोड (उपसरपंच )तुळशीराम चव्हाण श्याम आडे आशिष पांडे विजय कोकणे वीरेंद्र जाधव बळीराम पवार रमेश पवार मनोज भांडवले प्रवीण राठोड व व्यवहारे सर( मुख्याध्यापक ) संजय आडे (सर )राठोड सर चिलगरे सर पाटील सर भवरे सर मनोज राठोड (मदतनीस )विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते