समाजसेविका चंदा ताई बेलेकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार एस.एम.ई.ने सन्मानित दिगदर्शक साजिद खान व साऊथ कोरिया ग्रँड मास्टर किमयाँग हो यांच्या हस्ते दिला Social Worker Chanda Tai Belekar was given the International Award by SME Awarded Director Sajid Khan and South Korea Grand Master Kim Myung Ho

✒️सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

 पुणे (दि.9 मे ) :- चंदाताई बेलेकर यांनी अनेक महिलांना रोजगार मिळून दिले महिला बचत गट चालवतात वृक्षारोपण अनेक ठिकाणी केले त्यांचे स्वप्न आहे कोल्हापूर मध्ये संपूर्ण जिल्हात रस्त्याने वृक्षरोपण करण्याचे हे ध्येय आहे चंदाताई समाजासाठी वेळ देतात गरीब कुटूंबाना न्याय मिळून देतात आणि त्यांचे स्वतः संस्था आहे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे.

त्यांचे काम पाहून एक में महाराष्ट्र दिनाच्या पुरस्कार दिला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दिनांक एक मे 2023 रोजी पहिल्या एस एम इ आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण झाले.

या कार्यक्रमांमध्ये साऊथ कोरिया येथील ग्रँड मास्टर किमयाँग हो, मास्टर किम जुह युन, तर इंग्लंडहून मास्टर रोन ब्रेनन, मास्टर रेन ग्रीफिटस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले तर हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन एस एम इ चे एडिटर जय गोहिल, सब एडिटर भगवानराव कोळी यांनी केले होते. वैशालीताई कोळी अनिल माळवी यांचे विशेष सहकार्य लाभले सौ चंदाताई बेलेकर यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा