वरोरा-भद्रावती बाजार समिती सत्ता स्थापनेची सूत्रे आघाडीचे मुख्य सूत्रधार रविंद्र शिंदे यांच्याकडे Warora-Bhadravati Bazar Samiti’s sources of power formation lie with the leader of the alliance, Ravindra Shinde

490

🔸दोन्ही तालुक्यातील बहुमतात आलेल्या पैनलची बैठक संपन्न(The meeting of the majority panel in both the talukas was concluded)

 ✒️शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी

वरोरा (दि.3 मे ) :- नुकत्याच पार पडलेल्या वरोरा व भद्रावती येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत बहुमतात आलेल्या पैनलच्या उमेदवारांची नेतृत्वासह वरोरा येथे काल (दि.२) ला बैठक पार पडली. विजयानंतर सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेदरम्यान कोणताही घातपात होवू नये, उमेदवारांची पळवापळवी होवू नये, यासाठी विशेष लक्ष देवून लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी नेतृत्वाने प्रयत्न सुरू केले आहे. व सत्ता स्थापनेची सर्व सूत्र शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते आघाडीचे मुख्य सूत्रधार रविंद्र शिंदे यांचेकडे देण्यात आलेली आहे.

वरोरा विधानसभा क्षेत्रातील दोन्ही तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ही वरोरा येथे शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी व भद्रावती येथे शेतकरी सहकार शिवसेना या दोन्ही पैनलने बहुमताने जिंकली.

वरोरा येथील आघाडीचे नेतृत्व शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते जयंत टेमुर्डे, करण देवतळे यांनी केले तर भद्रावती येथील पैनलचे नेतृत्व शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी केले. यांच्या नेतृत्वाने प्रस्थापितांना पाणी पाजत विजय संपादित केला.

परिणामी प्रस्थापितांना या विजयाने चांगलेच हादरे बसले. पराजयाचा शिक्का लावून घेण्यापेक्षा फोडाफोडी करून सत्ता बसविता येते का याची चाचपणी पराजित पैनलने सुरू केली, तसे प्रयत्न वरोरा येथे झाले. वरोरा येथील एका विजयी उमेदवारास प्रस्थापित नेतृत्वाने गळास लावण्याचा प्रयत्न केले असता तातडीने रविन्द्र शिंदे यांनी सूत्र हलवित आघाडीचे नऊ विजयी उमेदवार सुरक्षित केले व प्रस्थापितांचे प्रयत्न हाणून पाडण्यात विजयी पैनलच्या नेतृत्वाने तूर्तास यश मिळविले आहे.

लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या उमेदवारांचीच बाजार समितीत सत्ता बसेल, असा संदेश या बैठकीतून देण्यात आला. रमेश राजूरकर हे खासगी दौऱ्या निमित्त विदेशात जात असल्याने व विधानसभा क्षेत्रात या आधी घडलेल्या घटनांची पार्श्वभूमी बघता व रवींद्र शिंदे यांच्या कार्याचा अनुभव बघता प्रस्थापितांना रविंद्र शिंदे हेच टक्कर देवू शकतात त्यामुळे त्यांच्या हातात सत्ता स्थापनेची सूत्रे दिल्या गेली आहे. त्यानुसार आगामी रणनीती शिंदे यांनी ठरविल्याची माहिती आहे.

दिवंगत विधानपरिषदेचे उपाध्यक्ष मोरेश्वरराव टेमुर्डे व दिवंगत आमदार संजय देवतळे यांच्या शेतकरी हिताच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी, यांनी विधानसभा क्षेत्रात राबविलेली सु-संस्कृती व शांततेचे राजकारण तथा विधानसभा क्षेत्रात लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न आहे. फोटो लावून विजय मिळत नसतो तर विजय हा जनसेवेच्या कार्यातून घडत असतो. कुणीही फोडाफोडीचे राजकारण करू नये. मतदारांच्या मतरुपी आशीर्वादाचा सन्मान राखावा. व पराजय स्वीकारावा, असे रविंद्र शिंदे यावेळी म्हणाले.

यावेळी विजयी उमेदवारांवर व सत्ता स्थापना प्रक्रियेवर आमचे संपूर्ण नियंत्रण आहे. विजयासाठी केलेले आमचे सांघिक परीश्रम आम्ही असे निष्फळ होवू देणार नाही, असे आघाडीचे दुसरे प्रमुख रमेश राजूरकर म्हणाले.

या महिन्यातील १२ तारखेला भद्रावती व १३ तारखेला वरोरा बाजार समितीच्या सभापतीची निवडणूक होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते जयंत टेमुर्डे, करण देवतळे, शिवसेना पदाधिकारी दत्ता बोरेकर, भास्कर ताजने, शिवसेना (ठाकरे) तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, प्रशांत कारेकर, राहुल मालेकर, घनश्याम आस्वले, बंडू नन्नावरे, मंगेश भोयर, प्रदीप महाकुलकर, विलास जीवतोडे व दोन्ही तालुक्यातील विजयी उमेदवार उपस्थित होते.