✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.16 एप्रिल) :-
उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्व शेतकरी आपल्या शेतीची मशागत करण्यास व्यस्त होऊन शेतात असलेला काडी कचरा जाळून आपले शेत स्वच्छ करून ट्रॅक्टर च्या साह्याने नांगरणी करीत असल्याचे पाहायला मिळते .
तसाच एक प्रकार चंदनखेडा – भद्रावती या मार्गावर पाहायला मिळाला. एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील काडी कचरा गोळा करून तो जाळला या कचऱ्याची आग धुऱ्या धुऱ्याने जाळून मुख्य मार्गावर येऊन पोहचली.
तर मुख्य मार्गावरील असलेल्या या झाडांनी पेट घेऊन काही क्षणातच बुडा पासून जळून मुख्य मार्गावर कोसळले तेव्हा चंदनखेडा – भद्रावती वरून ये जा करणाऱ्या प्रवास्याची तसेच दुचाकी , चारचाकी , जड वाहनांची गर्दी झाली .
असून ये जा करण्यास अडचण निर्माण झाली होती . व काही तास वाहतूक ठप्प झाली होती . तेव्हा गावकऱ्यांच्या मदतीने या झाडाची तोडणी करून रस्त्याच्या कडेला हटविण्यात आले व वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली …
