‘त्या’ शेळ्यांची निवड लाभार्थ्यांच्या आवडी-निवडी नुसारच The choice of ‘those’ goats depends on the preferences of the beneficiaries

306

🔸सुदृढ व निरोगी शेळ्यांचे वाटप केल्याचा पशुसंवर्धन विभागाचा खुलासा(Disclosure of Animal Husbandry Department about distribution of healthy goats)

✒️उमेश तपासे चंद्रपूर (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर ( दि. 06 मे ) : – पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शेळी गट (10 + 1) वाटप योजना कार्यान्वित आहे. सदर योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना शेळी गटाचा (10 शेळी व 1 बोकड) लाभ दिला जातो.

शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळच्या प्रक्षेत्र बोंद्री (ता. रामटेक, जि. नागपूर) येथून पुरवठा केला जात असला तरी प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या मर्जीनुसार व आवडी-निवडीनुसारच सुदृढ, निरोगी शेळ्या-बोकड वाटप करण्यात येतो, असे स्पष्टीकरण पशुसंवर्धन विभागाने दिले आहे. तसेच सदर शेळी गटाचा 3 वर्षाचा विमा कंपनीकडे काढला जातो. जेणेकरून शेळ्या आजारी पडून मृत्यु झाल्यास विमा क्लेम स्वरुपात नुकसान भरपाई होऊ शकेल.

नागभीड तालुक्यातील कोरंबी गावातील निरंजना देवराव जांभुळे या एकाच महिला लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात आला असून शेळ्यांच्या आजारा दरम्यान लाभार्थीने कळविण्यानुसार पशुवैद्यकीय अधिका-यांनी लाभार्थीच्या घरी जावून मोफत उपचार केले. औषधोपचार दरम्यान दोन शेळ्यांचा मृत्यु झाल्याचे निदर्शनास आले. तसेच सदर शेळ्यांचा विमा काढण्यात आला असल्याने शेळी मृत्युबाबत माहिती विमा कंपनीला देण्यात आली आहे.

सदर तालुक्यातील लाभार्थ्यांना वाटप झालेल्या वाटप झालेल्या आजारी शेळ्यांवर पशुवैद्यकीय अधिका-यांकडून औषधोपचारासाठी देखभाल सुरू आहे. शेळी गट वाटप दरम्यान सुदृढ, निरोगी शेळ्यांचे वाटप करण्यात आले. लाभार्थीने स्वत: आपल्या आवडी-निवडी व मर्जीनुसार 10 शेळ्या व एक बोकड घेतल्यामुळे आजारी शेळ्या देऊन लाभार्थ्याची फसवणूक झाली नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्य संपादक : मनोज गाठले 

संपर्क . 9767883091