शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होईल सामाजिक उपक्रमांनी साजरा Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) leader, Yuva Sena chief Aditya Thackeray’s birthday will be celebrated with social activities

🔸तमाम शिवसैनिकांनी सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे रविंद्र शिंदे यांचे आवाहन(Ravindra Shinde’s appeal to all Shiv Sainiks to participate in social activities)

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.12 जून) :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा मंगळवार, दिनांक १३ जून रोजी वाढदिवस असून यानिमित्त वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.

वरोरा-भद्रावती विधानसभा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कार्यालय ‘शिवालय’ येथून सामाजिक उपक्रमांची सुरुवात शिवसैनिकांच्या उपस्थितीत होणार आहे. 

यावेळी शिवसेना पूर्व विदर्भ संघटीका तथा प्रवक्ता प्रा.सौ. शिल्पाताई बोडखे, पूर्व विदर्भ संघटक सुरेशजी साखरे, युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे, चंद्रपूर जिल्हा संघटीका सौ. नर्मदा दत्ता बोरेकर, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजने, वरोरा-भद्रावती विधानसभा समन्वयक ज्ञानेश्वर डुकरे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरीकर, भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल या सर्व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थीती राहणार असुन दि. १३ जूनला सकाळी वरोरा-भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर कॅन्सर व गंभीर आजारांच्या गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

या निमित्ताने वरोरा व भद्रावती तालुक्यात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गाव शाखांचे उद्घाटन कार्यक्रम तथा युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्य होणाऱ्या सामाजीक तथा पक्ष सघंटन कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जेष्ठ शिवसैनिक खेमराज कुरेकार, प्रशात कारेकर, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, भद्रावती तालुका युवासेना प्रमुख राहुल मालेकर, भद्रावती बाजार समिती उपसभापती आश्लेषा जिवतोडे, त्रिशूल घाटे, बंडू पाटील नन्नावरे, प्रदीप महाकुलकर, बळीराम चवले, वैभव डहाने, निखील मांडवकर यांनी केलेले आहे.

यावेळी शिवसेना प्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रिदवाक्य ८०% समाजकारण व २०% राजकारण यास अंगिकारून व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे तथा युवा नेते आदित्य साहेब ठाकरे यांच्या कार्यातून प्रेरणा घेवून शेकडो युवा शाखा उद्घाटनाच्या निमित्ताने शिवसेनेत प्रवेश घेत आहेत.