अतिवृष्टी, पिक विमा नुकसान भरपाई करिता शेतकरी मारतात तहसीला वारंवार चकरा

✒️शेगाव बू .( विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू.(दि.17 जानेवारी) :- वरोरा तालुक्यातील नागरिकांच्या मुख्य व्यवसाय हा शेती असून शेगाव परिसरामध्ये कुठलाही मोठा उद्योग धंदा नसल्याने शेतकरी आपला कुटुंबाच्या उदरनिर्वाह शेतीवरच करत असतात..

 यावर्षी पावसाळ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेतामध्ये पेरलेले धान,कपास,तुर पिकांची मोठे नुकसान झाली शेतकऱ्यांच्या पिकांचे युद्धपातळीवर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली, परंतु अजून पर्यंत शेगाव परिसरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पिक विमा नुकसान भरपाई अनुदान मिळाले नाही.

तर काही शेतकऱ्यांचे बँक खात्यावर पैसे दुसऱ्याच्या पासबुकावर जमा होत असून शेतकऱ्यांना संबंधित अधिकारी बँक पासबुक ,आधार कार्ड झेरॉक्स, जमा करण्यामध्ये तहसील ऑफिसच्या चकरा मारायला लावत आहे, अगोदरच शेतकऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता केली असून वारंवार अधिकारीच शेतकऱ्यांना त्रास देत आहे पैसे जमा न झाल्यामुळे वारंवार शेतकरी बँकेत,तहसील कार्यालय,पटवारी ऑफिस इथे जाऊन चकरा मारत परत निराश होऊन येत आहे……