शेगाव पोलीस स्टेशन येथे इफ्तार पार्टी. रमजान ईद साजरी Iftar Party at Shegaon Police Station. Ramadan Eid celebration

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु. (दि.24 एप्रिल) :- 

         स्थानिक शेगाव बू येथे मुस्लिम बांधवांचा आनंदाचा तसेच महत्वाचा असलेला सण म्हणजे रमजान ईद , ईद च्या पावन पर्वावर शेगाव येथील सर्व मुस्लिम बांधवांना विशेष शुभेच्छा देत त्यांच्या साठी शेगाव बू चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते .

यात मुस्लिम बांधवांचा सत्कार करून त्यांना अल्पोहार भोजनाचे आयोजन करण्यात आले होते . तसेच रमजान ईद निमित्याने रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या . या करिता स्थानिक शेगाव पोलीस स्टेशन चे कर्मचारी तसेच गावातील नागरिक शांतता कमेटी शेगाव यांनी मोलाचे सहकार्य केले.