विमा कंपनी अधिकाऱ्याला खडसावले ..

विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्याला द्या… राजू चिकटे.

✒️वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.23 डिसेंबर):- यावर्षी अतिवृष्टी मुळे सततधार पावसामुळे वरोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले त्यामुळे येथील तसेच परिसरातील अनेक शेतकरी चिंताग्रस्त हवालदिल झाला . 

          तर आपल्या लाग लागवडीची बी बियाण्याची रक्कम शासनाकडून प्राप्त व्हावी या करिता अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला होता . परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले . यात कमीत कमी ७० ते ८० टक्के शेतकऱ्याचे शेत पिकाचे नुकसान झाले होते . दरम्यान याची सखोल चौकशी करिता विमा कंपनीचे अधिकारी प्रत्यक्ष येऊन शेतपिकाची पाहणी करून रीतसर पंचनामे केले . त्यामुळे येथील शेतकऱ्याला आपल्या बी बियाण्याचा खर्च निघेल अशी आशा सर्वांना लागली होती .. 

       परंतु कृषी विभाग तसेच विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपलीच बळजबरी करून येथील शेतकऱ्यांची चांगलीच थट्टा करून खर्चा पेक्षाही कमी रक्कम त्यांच्या खात्यात जमा करून त्यांच्या तोंडाला पाण पुसण्याचा प्रयत्न केला . त्यामुळे शेतकरी संतापले . व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय , वरोरा कृषी अधिकारी कार्यालय, पीक विमा कार्यालयाला धडक देऊन शेतकऱ्याला योग्य न्याय देऊन झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी यांनी करू लागले होते . 

       करिता युवा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती श्री राजू चिकटे यांनी याची विशेष दखल घेऊन संबंधित अधिकारी , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर श्री भाऊसाहेब बऱ्हाटे , तालुका कृषी अधिकारी वरोरा श्री जी. एम. भोयर , मंडळ कृषी अधिकारी शेगाव श्री विजय काळे , जिल्हा पीक विमा प्रतिनिधी श्री निलेश धोपटे , तालुका पीक विमा प्रतिनिधी तुषार चौधरी , यांना प्रत्यक्ष चारगाव खुर्द येथे बोलावून झालेल्या नुकसानीचा प्रकार त्यांच्या डोळ्या समोर मांडण्यात आला. तेव्हा संतप्त शेतकऱ्याची आर्त हाक ऐकून कृषी अधिकारी तसेच पिक विमा कंपनी अधिकाऱ्याला चांगलाच घाम फुटला . 

                तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती श्री राजू चिकटे तसेच सर्व पीडित शेतकरी यांच्या मागणी ची दखल घेऊन येत्या सोमवार , मंगळवार , पर्यंत सखोल चौकशी करून पीक विमा कंपनीला आदेश देऊन तात्काळ सर्व शेतकऱ्यांना योग्य पिक विमा ची योग्य रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी ग्वाही या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक चंद्रपूर श्री भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली . यावेळी योगेश खामानकर, दुर्गेश पावडे , चंदू पेचे , शांताराम तितरे , अशोक मिसाळ, निलेश डोळस , खाडे पाटील , अभिजीत पावडे , तसेच गावातील व परिसरातील अनेक पीडित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते….