🔸दहा प्रवासी जखमी
✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.24 एप्रिल) :-
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील चिखलगाव जवळ लग्न लागल्यानंतर वरात घेऊन येताना वऱ्हाडी वरात लग्न समारंभ कार्य करून परत येत असताना अचानक बस चा टायर फुटल्याने बस पलटी झाल्याची घटना उघडकीस आली आहे .
M.H.12 K.Q. 0919 या क्रमांकाची मिनी बस पलटी झाली यात जवळपास दहा वऱ्हाडी किरकोळ जखमी झाल्याचे समजते . सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील वऱ्हाड घेऊन सावली तालुक्यातील गेवरा येथून लग्नकार्य आटोपून गावाचे दिशेने निघाले होते तेवढ्यात चिखलगाव नांदगाव हे तीन किलोमीटर अंतर पार करण्यापूर्वी चिखलगाव जवळ बस पलटली व ही घटना घडली .
तात्काळ हायवे पोलीस व तळोधी बा.पोलीस दाखल झाले . त्यांनी दोन रुग्णवाहिकेतून शिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णलयामध्ये दाखल करण्यात आले . जखमींचे नावे कडू शकले नाही पुढील तपास ठाणेदार दिनकर शेंडे यांचे मार्गदर्शनाखाली देहारे मेजर , गोवर्धन p.s.I., , संजय मांढरे मेजर , पो. का.उमेश मस्के हे विशेष तपास करीत आहेत.
