पोहायला जाणे महागात पडले  Going swimming became expensive 

342

🔸तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.20 एप्रिल) :- 

     चिमूर तालुक्यातील पळसगाव येथील तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाला पाण्याचा अंदाज न समजल्याने खोल पाण्यात जाऊन तरुणाचा मृत्यू झाला . प्रज्वल रामभाऊ चौधरी वय २२ वर्ष राहणार पळसगाव असे मृतक तरुणाचे नाव आहे . 

       त्यांच्या सवगळी मित्रांनी त्याला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांच्या पदरी अपयश मिळाले व प्रज्वल चा जागीच मृत्यू झाला. चिमूर पोलीस हद्दीत येत असलेल्या गडी तलाव येथे ही दुर्दैवी घटना घडली. 

     याची माहिती चिमूर पोलीस अधिकारी यांना मिळताच घटना स्थळ गाठून मृतदेह बाहेर काढून पुढील तपास करण्यात आला .

https://smitdigitalmedia.com/