Home चंद्रपूर काटवल(तू) येथील बैलगाडी शर्यतीचे शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या हस्ते उद्घाटन  Inauguration of bullock cart race at Katwal(Tu) by Shiv Sena district chief

काटवल(तू) येथील बैलगाडी शर्यतीचे शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या हस्ते उद्घाटन  Inauguration of bullock cart race at Katwal(Tu) by Shiv Sena district chief

0
काटवल(तू) येथील बैलगाडी शर्यतीचे शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या हस्ते उद्घाटन   Inauguration of bullock cart race at Katwal(Tu) by Shiv Sena district chief

✒️शिरीष उगे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.19 एप्रिल) :- 

               भद्रावती तालुक्यातील काटवल(तू) येथे १४ ते २१ एप्रिल दरम्यान बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी पार पडले. यावेळी बैलगाडीवरून मुकेश जिवतोडे यांची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली.

या कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, युवासेना भद्रावती तालुका प्रमुख राहुल मालेकर , काटवलचे सरपंच दादा नन्नावरे, भीमराव सांगोळे, पोलीस पाटील राजेंद्र पोईनकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पिंटू जनबंधू, शाळा समिती अध्यक्ष शरद चौधरी, मुख्याध्यापक निलगिरवार, डॉ बनिक, उपसरपंच मंदा ढोणे, पोलीस पाटील सुनीता वाटबरई, वन समिती अध्यक्ष निखिल गारगाटे, ग्रामसेवक शिरपूरकर, तलाठी पूसनाके, ग्रामपंचायत सदस्य मनोहर गजभे, भाऊराव पोईणकर,श्रीधर गजभीये,माजी ग्रामपंचायत सदस्य बाबुलाल दुधबारवी, चंद्रभान नेवारे, मनोहर गजभिये उपस्थित होते.

या प्रसंगी उद्घाटनानंतर बैल जोडी शर्यतीला प्रारंभ झाला. सदर कार्यक्रमाला आयोजन समितीचे अध्यक्ष जगदीश राऊत, उपाध्यक्ष हनुमान राणे, सचिव शामराव श्रीरामे, सहसचिव चंद्रभान नेवारे, कोषाध्यक्ष पिंटू जनबंधू उपस्थित होते. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याने त्याला ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

https://smitdigitalmedia.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here