उष्माघाताने मजुराचा मृत्यू Death of laborer due to heat stroke

🔸चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला उष्मघाताचा बळी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.20 एप्रिल) :- 

    चंद्रपूर जिल्ह्याच्या पारा वाढण्यास सुरुवात झाली असून सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे त्यामुळे भर उन्हात काम करणे तसेच बाहेर फिरणे हे घटक ठरू लागले आहे तर याचा परिणाम वृद्ध व लहान मुलावर बालकावर जास्त परिणाम होत असल्याने वाढत्या उन्हाची दाहकता लक्षात घेऊन बाहेर पडले टाळावे तसेच दुपार फेरीतील काम करणे बंद करावे.

   राज्यभरात तापमान वाढत असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. एकीकडे तापमान प्रचंड वाढत आहे तर दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे.सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे जीवाची लाहीलाही होत आहे.परिणामी बल्लारपूर तालुक्यात बामणी(दु) येथे उष्माघाताचा आज बुधवार दि.१९एप्रिलला दुपारी बळी गेला असून मजूराचा मृत्यू झाला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे.

अधिक माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील बामणी ग्रामपंचायत हद्दीतील बामणी प्रोटिन्स कारखान्याच्या जवळ राष्ट्रीय महामार्गाला लागून अनोळखी इसमाला उन्हामुळे चक्कर आल्याने तो खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

सदर प्रकारची माहिती बामणी ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीहरी अंचुर यांना समजताच त्यांनी घटनास्थळाला सहकाऱ्यांसह भेट देत बल्लारपूर पोलिसांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली.दिलीप चौधरी व खंडेराव माने पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा व तपासणी केली असता मृतक गोंडपीपरी तालुक्यातील धानापूर येथील असून त्याचे नाव गजानन बोपणवार (६५)असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांना माहिती देत प्रेत उत्तरीय तपसणी साठी बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

     चंद्रपूर जिल्ह्यात ४३ अंश सेल्सियास पेक्षा जास्त तापमान आहे. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उष्माघाताचा धोका वाढला आहे.परिणामी हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे लोकांना उष्णतेपासून काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ञ देतात.वृद्धापकळपासून ते लहान मुलापर्यंत दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ञानी दिला आहे.