शंकरपूर कांपा रस्त्यावर लावले बेशरम चे झाड़

▫️गावातील युवकाचा पुढाकार

✒️जगदीश पेंदाम (शंकरपूर प्रतिनिधी)

शंकरपुर(दि.24 सप्टेंबर) :- कांपा चिमूर हा राज्य महामार्ग आहे या रस्त्यावर पडलेले खड्डे हे अपघाताला आमंत्रण देत आहे बांधकाम विभागाकडून हे खड्डे बुजविन्यात आले नसल्याने त्या खड्यामध्ये बेशरम चे झाडे लावून येथील युवकांनी बांधकाम विभागाचा निषेध केला आहे 

चिमूर कांपा हा राज्य महामार्गवर 15 गावे बसले आहे तर रस्त्याच्या परिसरात 30 गावे आहेत तर 33 किलोमीटर चे अंतर आहे या सर्व गावातील नागरिकांना या रस्त्याचा वापर करावा लागतो परंतु या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत शंकरपूर ते कांपा या आठ किलोमीटर च्या अंतरावर तर जीवघेणे खड्डे आहेत या रस्त्यावरून दुचाकी चालविणेही कठीण झाले आहे.

या रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरूम व गिट्टी टाकून दोनवेळा बुजविले परंतु खड्डे आहे तसेच आहे त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून खड्डे बुजविण्यासाठी आलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे त्यामुळे हा रस्ता होणार की नाही असाप्रश्न निर्माण झाला असून सध्यातरी या रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजविण्यात यावे.

यासाठी येथील युवकांनी बेशरम चे झाडे लावून लक्ष वेधले आहे हे बेशरम चे झाडे आमोद गौरकर अशोक चौधरी आशिष चौधरी निखील गायकवाड आशु हजारे गणेश वानकार साधू गेडाम विनोद घरत अमन मेश्राम प्रियंशु वाढई नंदू शेरकी मनोज सहारे रुपेश रंदये बबलू शेख आदिंनी लावले आहे.