मजरा( लहान) येथे भव्य महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन

243

✒️वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.12 फेब्रुवारी) :-ग्रामसेवा समिती सालोरी येन्सा ब्लॅक मजरा (लहान) व सर्व महिला बचत गट, समस्त गावकऱ्यांच्या वतीने दिनांक 13, 14 फेब्रुवारी ला दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ग्रामसफाई, रांगोळी स्पर्धा, शालेय मुलांना स्कूल बॅग व वाटर बॅगचे वितरण ,दिव्यांग व्यक्तींना कपडे वाटप, महिला बचत गट व आशा वर्कर यांचा सत्कार तसेच समाजातील होतकरू व विशेष कामगिरी करणाऱ्या महिला, दिव्यांग व गरीब दुर्बल घटकातील ज्याचे कुटुंबातील कोरोना काळात मृत्यू झाले अशा कुटुंब यांना आर्थिक मदत तसेच आदरणीय लक्ष्मणराव गमे साहेब सर्वाधिकारी गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी व परमानंद तिराणीक,निरज आत्राम सर यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक वरोरा भद्रावती निर्वाण क्षेत्राचे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमात अंबुजा सिमेंट फाउंडेशन वरोरा यांचे बचत गटातील महिलांना विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. दिनांक 13 ला रात्री शिवछत्रपती कला प्रबोधन मंडळ दहेगाव यांचे समाजप्रबोधनात्मक नकला, किर्तन, जनजागृती व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 14 फेब्रुवारी मंगळवार ला ग्रामसफाई, महिला कबड्डी स्पर्धा, संगीत खुर्ची व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मिलिंद भोयर माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी अंबुजा सिमेंट फाउंडेशन वरोरा यांचे वतीने शेती विषयक जनजागृती पर पथनाट्य होणार आहे व रात्री महिला बचत गटातील महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम डान्स होणार आहे. असे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ग्यानीवंत गेडाम,सारीका धाबेकर यांनी कळविले आहे.

https://smitdigitalmedia.com/