प्रत्यक्ष जेसीबी लाऊन मार्ग केला मोकळा.. सुधीर मुडेवार यांचा प्रयत्न  Cleared the way by directly bringing jcb..sudhir mudewar’s effort

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.16 एप्रिल):-

            सध्याच्या परिस्थितीत सर्व शेतकरी बांधव आपल्या शेतीची मशागत करण्या करिता कामात व्यस्त असून शेतात असणारा काडी कचरा , कापसाची झाडे , जाळून शेती स्वच्छ करून ट्रॅक्टर च्या साह्याने नांगरणी करीत असल्याचे पाहायला मिळते आहे. तेव्हा प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये वणवा लाऊन साफ सफाई करतात . 

        एका शेतकऱ्याने आपल्या शेतात सफाई करून काडी कचरा जाळला असता हा वणवा चंदनखेडा – भद्रावती या मार्गावर पोहचला असता रस्त्याच्या कडेला असलेले भव्य मोठे झाड या वणव्यात मिळाले तेव्हा या झाडाच्या बुडाला आग लागून हे झाड चंदनखेडा – भद्रावती या मार्गावरील मधोमध कोसळले तेव्हा ये जा करणारे सर्व वाहने ठप्प झाले व वाहतूक बंद झाली तेव्हा तात्काळ जाण्याकरिता प्रवास्यानी मोठा आरडा ओरड केली . तरी देखील दोन तास लोटून देखील या झाडाला हटविण्यात आले नव्हते .

तेव्हा याची माहिती श्री सुधीरभाऊ मुडेवार युवा काँग्रेस नेते यांना मिळताच घटना स्थळ गाठून प्रत्यक्ष घटनेची माहिती घेतली तेव्हा अनेक प्रवासी उन्हामुळे बेजार होते तर अनेक प्रवासी तहानलेले देखील होते ही बाब गंभीर असल्याचे पाहून तात्काळ गावातील जेसीबी यंत्र सामुग्री स्वखर्चातून बोलाऊन एका तासात मार्ग सुरळीत केला . व अखेर तीन तासात मार्ग पूर्णपणे मोकळा करून झाळ ला रस्त्याच्या कडेला हटविण्यात आले.