महापुरूषांच्या शिकवणीनेच समाजात समानता निर्माण होईल -डॉ. अंकुश आगलावे Equality will be created in the society only by the teachings of great men – Dr. Ankush aaglave 

126

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)       

चंद्रपूर (दि.16एप्रिल) :-

         राष्ट्रसंत व महापुरूषांच्या विचारातुन समाजात समता बंधुभाव निर्माण होईल असे मत विदर्भ प्रदेश अध्यक्ष केंद्रीय मानवाधिकार संगठन नवी दिल्ली चे डॉ. अंकुश आगलावे यांनी सावर्ला येथील आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रसंगी व्यक्त केले.

          महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्था व सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी अतिशय मोलाचे कार्य केले. सामाजिकदृष्टया मागासलेल्या वर्गासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे देवापेक्षा कमी नाही असे डॉ. अंकुश आगलावे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेवून देशाचा विकास साधून संपूर्ण विश्वात भारत देशाचे नांव लौकीक केले पाहिजे असेही डॉ. आगलावे यांनी सांगितले.

          कार्यक्रमाचे आयोजन सम्यक बौध्द मंडळ सावर्ला व सम्राट अशोक गायन पार्टी सावर्ला च्या वतीने करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठया उत्साहात साजरी केली. या जयंती कार्यक्रमात लंुबीनी महिला मंडळ, सावर्ला, सार्वत्रिक नवदुर्गा उत्सव मंडळ, शिव जयंती उत्सव मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समिती, बिरसामुडा बिग्रेड गट , ंसपूर्ण महिला बचत गट व समस्त सावर्ला ग्रामवासीयांनी जयंती उत्सवात सहभाग घेतला.

         या प्रसंगी माजी कुलगुरू नागपूर विद्यापीठ डॉ. भालचंद्र चोपने सर यांचा ग्रामगीता व भगवी टोपी, शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. बोधे सर, गीत घोष सर, मंडळ अधिकारी , चोपने ताई सरपंच सावर्ला, रामदास चोपने ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता भाऊराव पाटील, राऊतजी, देठे सर, तामगाडगे सरपंच यांनी अथक परिश्रम घेतले.

https://smitdigitalmedia.com/