
?युवक युवती ने मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन
✒️योगेश मेश्राम चिमूर (मालेवाडा विशेष प्रतिनिधी)
मालेवाडा (दि.2 एप्रिल) :- चिमूर येथे ११ एप्रिल २०२३ रोज मंगळवार ला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त नि:शुल्क निबंध स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेचे स्थळ नेचर फाउंडेशन अभ्यासिका, स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वर,चिमूर येथे होणार आहे या स्पर्धेचा वेळ ठीक सकाळी ११ ते १२ वाजता पर्यंत या स्पर्धेचा विषय याप्रमाणे राहील,
१) क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे बहुजन समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रागतीतील योगदान.
२) बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाच्या आर्थिक,सामाजिक,व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान. या स्पर्धेचे काही अटी राहतील, १)ही निबंध स्पर्धा सर्व गटातील विद्यार्थ्यांकरिता खुली आहे.
२) निबंध हा १००० ते १५०० शब्दात असणे आवश्यक आहे.
३) खालील नंबर ला फोनद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे अन्यथा स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. असे पद्धतीने अटी राहतील.या स्पर्धेला प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक राहणार आहे.प्रथम क्रमांक – 1000रु. ( शारदा धनराज गेडाम शिक्षिका जि.प.प्राथ. शाळा मेटेपार)
द्वितीय क्रमांक – 700 रु.(गुणवंता घनश्याम रामटेके शाखा-व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र अहेरी जि. गडचिरोली.
तृतीय क्रमांक – 500 रु. प्रतिभा कंनाके ग्रामसेवक ग्रा प शिवापुर बंदर ता.चिमूर जि. चंद्रपूर याच्याकडून राहील स्पर्धेला नोंदणी करता संपर्क निलेश नंन्नावरे ९५१८५६३५९९ निखिल मोडक ७७९८२१००२७ या स्पर्धेला जास्तीत जास्त सहभाग दर्शवा वा ही विनंती नेचर फाउंडेशन यांनी केली आहे.
