शेगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस शिपाई तसेच पोलीस पाटील यांचा सत्कार Police constable and police patil felicitated at shegaon police station 

409

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु(Shegaon BK प्रतिनिधी)

 शेगाव बु (दि 10 एप्रिल) :- स्थानिक शेगाव बू येथे येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ,रमजान ईद निमीत्याने मासिक मिटींग घेवुन त्यांना या उत्सवा बाबत मार्गदर्शन करण्यात आले शिवाय गावात सण उत्सव शांततेत कसे साजरे करता येईल यावर अधिक लक्ष द्यावे वरीष्ठांकडुन उत्सवा निमीत्य प्राप्त परीपञकाची माहीती देवुन उत्सव शांततेत पाडावे अशा सुचना देण्यात आल्या . 

 तसेच पोलीस स्टेशन शेगाव बु येथे पो.हवा.मदन येरणे हे रजेवर असताना देखील आपले कार्य बारकाईने करून ते पूर्ण करतात तपासाचे कामे उत्कुष्ट करतात. पोलिस स्टेशन मध्ये सर्वांना त्यांच्या कामात मदत करतात. तपास लेखाजोगा पेंडींग ठेवत नाही. अश्या अनेक त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांचा कामाचा गौरव होऊन इतर अमलदार प्रेरित व्हावे यासाठी त्यांना पुष्प गुच्छ , सन्मानपत्र, मोमेंटो देऊन त्यांना गौरविण्यात आले..

तसेच मार्च महिन्यात मध्ये सीसीटीएनएस प्रणाली मध्ये उत्कृष्ट काम करणारी मपोअं.माधुरी हिचा पण पुष्प गुच्छ, सन्मानपत्र, मोमेंटो देऊन गौरव करण्यात आले 

तसेच मार्च महिन्यात उत्कुष्ट काम करणारे पो.पा.मंगला पोटे रा.मोखाडा हिचे सुध्दा पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, मोमेंटो देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आले.  

सदर कार्याची दखल घेऊन पोलीस शिपाई तसेच पोलीस पाटील यांचा सत्कार येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.. यावेळी psi श्री प्रवीण जाधव , श्री महादेव सरोदे , श्री किशोर पिरके , पोलीस शिपाई श्री देवा डुकरे , रमेश पाटील , व अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.