शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना सैनिक अभिजित कुडे यांच्या प्रयत्नाने दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचले विद्युत ट्रान्सफॉर्मर

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.13 ऑक्टोबर) :- शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा सच्चा कार्यकर्ता अभिजित कुडे यांच्या कामाचा झंझावात हा खरोखरच एखाद्या परिपक्व नेत्याला लाजवेल असाचआहे , कारण ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्याचे परिपूर्ण ज्ञान असलेले अभिजित कुडे हे प्रशासनाशी ग्रामीण जनतेच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी झगडताना त्यामुळे त्यांचा आक्रमक शैलीमुळे त्यांचे काम लवकर होतें अश्याच एका प्रश्नाला त्यानी वाचा फोडली असून शेतकर्‍यांच्या प्रलंबित प्रश्नाला त्यानी एका दिवसात सोडविले आहे.

उखर्डा येथील शेतकऱ्यांनी अभिजित कुडे याना फोन केला की भाउ आमचा शेतातील ट्रान्सफरमर बंद आहे तर तुम्हीं महावितरण कार्यालयात येता काय . त्यानी लगेच शेतकऱ्यांची भेट घेतली त्यांची समस्या जाणून घेतली वरोरा येथे मुख्य अभियंता याना कॉल करून विचारणा केली त्या नंतर तातडीने ट्रान्सफरमर लावायला सांगितली .

अधिकारांना फोन करून तात्काळ लावायला सांगितली ट्रान्सफरमर लावायला उशीर का अस अधिकाऱ्यांना विचारले तेव्हा ,अभिजित कुडे यांनी आक्रमक भूमिका घेउन मला उद्या च्या उद्या ट्रान्सफरमर पाहिजे असे ठणकावून सांगितले आणि, काय आश्चर्य दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या शेतात डीपी बसविण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले व त्यामुळे अभिजित कुडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे व तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांचा आदेशानुसार शेतकर्‍यांच्या कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास ते सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे असा विश्वास दिला. कोणत्या अधिकार्‍यांनी जर सर्व सामान्य माणसाला, शेतकर्‍याला त्रास दिला तर ठोकू पण लोकांचे काम करू असे आश्वासन दिले.