वार्षिकोत्सवातून विद्यार्थ्यांना स्टेज डेरिंग मिळते…माजी नगराध्यक्ष अनील धानोरकर

🔸भद्रावती येथे युरो लिटल स्कुलचा वार्षीकोत्सव

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.16 डिसेंबर) :- आपल्यातील अंगभूत गुणांचे प्रदर्शन करायचे असल्यास प्रत्येकामध्ये स्टेज डेरिंग ची निर्मिती होणे आवश्यक आहे.स्टेज डेरिंग नसल्यास एखाद्या मध्ये कौशल्य असले तरी तो स्पर्धेत मागे पडतो. शाळा महाविद्यालयांच्या वार्षिकोत्सवातून अगदी लहानपणापासून विद्यार्थ्यांना स्टेजवर वावरण्याची संधी मिळते.त्यामुळे प्रत्येक शाळा तथा महाविद्यालयाच्या अशा उत्सवांना महत्त्व प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले. स्थानिक वृंदावन सभागृहात युरो लिटल स्कूलचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. त्यात ते बोलत होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, डॉक्टर आनंद निते,किशोर हेमके, स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अक्षय हेमके, सी जी नायर, अभी हेमके, प्रमोद नागोसे, कुमुद हेमके,कोमल नागोसे, स्नेहा कवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेत शिक्षक हे आपले कर्तव्य पार पाडत असतात. मात्र पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या विकासात हातभार लावावा असे मत युरो लिटल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अक्षय हेमके यांनी यावेळी आपल्या भाषणातून केले व्यक्त केले.

यावेळी शाळेतील लहान लहान विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका,भाषण आदी उत्कृष्टपणे सादर करून आपल्यातील सुप्त गुणांचे प्रदर्शन करून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे संचालन दिव्यता लोणारकर व वैशाली कामटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संगीता खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आकांक्षा रामटेके, कल्याणी पांडे, किरण रामटेके, सुनिता दारुंडे आदींनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, पालक तथा नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.