नंदुरबार शहरातील तनु माळी झाली रील स्टार Tanu Mali from nandurbar town became a reel star

283

✒️ अंकुश कुमावत नंदुरबार (nandurbar विशेष प्रतिनिधी)

नंदुरबार (दि.9 एप्रिल) :- तनु धर्मेंद्र माळी ही मुळची नंदुरबार जिल्ह्याची रहिवासी आहे. तिचे वडिल एका ऑइल कंपनी मध्ये मॅनेजर पदावर आहेत व आई हाऊस वाईफ आहे. 

     तनु ला एक्टिंग ची फार आवड असल्याने तिने ईतर व्हिडिओ व रिल्स् बघत बसायची. जेव्हा तिला वाटले की मी ही आसे रील्स करू शकते तेव्हा तिने तिच्या आई ला सागितले की मला आसे इंस्टाग्राम अँप वर रिल्स् काढायचे आहे, तर तिच्या आई ने तिला पूर्ण पाठिंबा दिला,व तनु ने 1 डिसेंबर 2021 ला तिने इंस्टाग्राम वर आपले नावाचे अकाउंट ओपन केले, आणि व्हिडिओ बनवण्यात सुरुवात केली व बघता बघता तिच्या व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिले व तिचे बरेच फॉलोवर्स वाढत आहे.

कमी दिवसात तिचे 10 हजार फॉलोवर्स झाले. व्हिडियो चांगल्या प्रकारचे आसल्या कारणाने तीचे घरी व समाजामध्ये बरचं कौतुक होऊ लागले, बरेच ठिकाणी तिला लोक ओळखु लागले तिचा सोबत सेल्फी व फोटो काढू लागले व आता तनु चे 80K फॉलोवर्स झाले आहे, लवकर 100K होणार आहेत.

   अहिराणी भाषेची फार आवड असल्याने तनु चे सर्व व्हिडिओ आणि रील्स् हे आहिराणी भाषेत असतात तिला ती भाषा चांगल्या प्रकारे येते व आहिराणी चे बरचे खांदेशी व मराठी कलाकार तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि चांगल्या लूक व एक्टिंग मुळे पुढे चालून ती अहिराणी व मराठी गाण्यांमध्ये पण दिसू शकते.

    आपली आहिराणी भाषा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे हाच तिचा हेतू आहे.

तनु माळीच्या पुढिल उज्वल भविष्यासाठी स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र व डायमंड कलाकार ग्रुप च्या वतिने खुप शिवमय शुभेच्छा.