कपाशीच्या पिकावर तन नाशक फवारून केले शेतकऱ्याचे नुकसान

🔸गुन्हा दाखल 

✒️ गजानन लाडंगे महागाव(Yavatmal प्रतिनिधी)

महागांव(दि.28 जून) :- तालुक्यातील कासारबेळ येथील गजानन लांडगे यांच्या शेतातील कपाशीच्या पिकावर शेजारच्या शेतकऱ्यांनी तन नाशक फवारल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. 

धुर्‍यावर तन नाशकांची फवारणी करत असताना शेतामध्ये येऊन अर्धा एकर कपाशीवर फवारणी केल्याने त्या कपाशीचे संपूर्ण नुकसान झाले आहे. अंदाजे २५ हजाराचे नुकसान झाल्याने संबंधित शेतकऱ्यांनी महागांव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.