२६ / ११ च्या आतंकवादी हल्यातील शहिद हुतात्म्यांना श्रद्धांजली व संविधान दिन साजरा

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.27 नोव्हेंबर) :- फौजी वाॕरीअर्स मार्शल आर्टस् वरोरा च्या वतीने आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ ला सायंकाळी ६-०० वाजता वरोरा येथिल शहीद योगेश डाहुले स्मारकावर मुंबई येथिल २६ / ११ ला झालेल्या भ्याड आतंकवादी हल्यात शहीद झालेल्या अमर हुतात्म्यांना श्रद्धांजली व संविधान दिन साजरा करण्यात आला .

               फौजी वाॕरिअर्स च्या विद्यार्थ्यांना यावेळी २६/११ च्या आतंकवादी हल्याची पार्श्वभूमी व आतंकवाद्यांनी हाच दिवस का निवडला याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले . विद्यार्थ्यांना देशासाठी कामी आलेल्या शहीदांविषयीचा आदर आणि सन्मान कायम स्मरणात रहावा हा या आयोजनाचा उद्देश होता . मार्गदर्शनानंतर मौन श्रद्धांजली पाळण्यात आली .

          यावेळी फौजी वाॕरिअर्सचे पदक विजेते सर्व खेळाडू तसेच प्रशिक्षक डी एन खापने , प्रविण चिमूरकर ,रविन्द्र तुराणकर ,रवी चरुरकर ,गोपाळ गुडघे सर, दौलत ढोके, रणजित राऊत , बंडू पाटेकर, अजू धोटे, सुनील गज्जलवार, भूषण कांबळी, पंकज शेंडे, गणू चिंचोलकर, व सदभावना युवा एकताचे सर्व पदाधिकारी व वरोरावासी मोठ्या संख्येने उपस्थित होते .